Home अहिल्यानगर Ahmednagar: साफसफाई करणाऱ्या महिलेचा विनयभंग

Ahmednagar: साफसफाई करणाऱ्या महिलेचा विनयभंग

ahmednagar Humiliation of a woman cleaning

अहमदनगर | Ahmednagar: शहरातील भिस्तबाग चौक परिसरात साफसफाई करणाऱ्या महिलेचा विनयभंग केल्याची घटना बुधवारी सकाळी घडली. याप्रकरणी आरोपीविरोधात तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी पिडीत महिलेने फिर्याद दिली असून या फिर्यादीवरून मयूर आबासाहेब गायकवाड रा. वाणीनगर याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, पिडीत महिला सकाळी भिस्तबाग चौक परिसरात साफसफाईचे काम करीत असताना आरोपी मयूर गायकवाड तेथे येऊन तिचा पकडून लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केल्याने सदर महिलेने पोलीस ठाण्यात धाव घेत फिर्याद दाखल केली. यावरून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून याप्रकरणी अधिक तपास तोफखाना पोलीस करीत आहे.   

Web Title: ahmednagar Humiliation of a woman cleaning

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here