Home अहमदनगर अहमदनगर जिल्ह्याला मंत्रिमंडळात झुकते माप

अहमदनगर जिल्ह्याला मंत्रिमंडळात झुकते माप

Breaking News | Ahilyanagar: जिल्ह्यात दहा आमदार आणि एक मंत्रिपद, अजित दादांकडून एकही मंत्रिपद नाही.

Ahmednagar district is tipped in the cabinet minister

अहमदनगर: राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर अजित पवार यांनी मात्र जिल्ह्याकडे दुर्लक्ष केले. मागील अडीच वर्षात एकही मंत्रिपद दिले नाही. यावेळी चार आमदार निवडून आले, परंतु एकालाही मंत्रिमंडळात स्थान मिळाले नाही. त्यामुळे जिल्ह्याकडे दुर्लक्ष केल्याची भावना राष्ट्रवादीच्या कार्यकत्यांमध्ये आहे.

इतर जिल्ह्याच्या तुलनेत दृष्टीने राज्यात सर्वाधिक मोठा असलेल्या नगर जिल्ह्यावर अन्याय क्षेत्रफळाच्या अहिल्यानगर जिल्ह्यात महायुतीचे बारापैकी तब्बल दहा आमदार निवडून आले, तरी अवघे एकच मंत्रिपद पाच आमदार असताना तेथे तीन मंत्रिपदें, नागपूर जिल्ह्यात नऊ आमदार निवडून आलेले असताना तीन मंत्रिपदे तर बीड जिल्ह्यात पाच आमदार असताना दोन मंत्रिपदे देण्यात आली. त्यामुळे मंत्रिमंडळ विस्तारात महायुतीने अहिल्यानगर जिल्ह्यावर अन्याय केल्याचे बोलले जात आहे. जिल्ह्याच्या वाट्याला आले. दुसरीकडे, सातारा जिल्ह्यात महायुतीचे आठ आमदार निवडून आलेले असताना तेथे चार मंत्रिपदे देण्यात आली. तसेच यवतमाळ जिल्ह्यातही जिल्ह्यात शिंदेसेनेने खाते उघडले, पण मंत्रिमंडळात स्थान नाही शिवसेनेने एकसंध असताना गतवेळी जिल्ह्यातील अपक्ष आमदार शंकरराव गडाख यांना मंत्री केले, शिवसेनेत फूट पडून दोन गट तयार झाले. यावेळी शिंदेसेनेने जिल्ह्यात बाजी मारली, शिंदेसेनेचे विठ्ठलराव लंघे व अमोल खताळ हे दोन आमदार निवडून आले; पण शिंदेसेनेनेही अहिल्यानगर जिल्ह्याचा विचार केला नाही.

काँग्रेस-राष्ट्रवादीचा एकेकाळी नगर जिल्हा बालेकिल्ला होता. राज्याच्या मंत्रिमंडळात कायमच नगर जिल्ह्याचा दबद‌बा राहिला. काँग्रेस व राष्ट्रवादीने जिल्ह्याला सतत मंत्रिपदे दिली. राष्ट्रवादी एकसंध असताना शरद पवार यांनी नगर जिल्ह्याला मंत्रिपदे दिली तसेच पालकमंत्री पदही पक्षाकडे ठेवण्याचा प्रयत्न केला. यंदा जिल्ह्यात राष्ट्रवादी व भाजपचे संख्याबळ समान आहे. दोन्ही पक्षांचे जिल्ह्यात प्रत्येकी चार आमदार निवडून आले. भाजपने राधाकृष्ण विखे पाटील यांना मंत्रिमंडळात पुन्हा स्थान दिले. त्यामुळे जिल्ह्यातील भाजपचा दबदबा याही मंत्रिमंडळात कायम राहिला. राष्ट्रवादी अजित पवार गटाने मात्र, मागील अडीच वर्षांतही जिल्ह्याला मंत्रिपद दिले नाही. तसेच याहीवेळी मंत्रिमंडळात जिल्ह्याला डावलले. राष्ट्रवादीकडून कोपरगाव मतदारसंघातून आशुतोष काळे हे राज्यात विक्रमी मतांनी विजयी झाले. अकोल्याचे आमदार डॉ. किरण लहामटे है आदिवासी समाजाचे नेतृत्व करतात. ते सलग दुसऱ्यांदा विधानसभेत पोहोचले. अहमदनगर शहराचे आमदार संग्राम जगताप हे तिसऱ्यांदा निवडून आले. पारनेरचे आमदार काशिनाथ दाते हे पहिल्यांदाच विधानसभेत पोहोचले. यापैकी काळे, लहामटे व जगताप है मंत्रिपदाचे दावेदार होते. परंतु, मंत्रिमंडळ विस्तारात अजित पवार गटाला जिल्ह्यात एकही मंत्रिपद मिळाले नाही. पुढील काही दिवसांत जिल्हा परिषद, महापालिका, नगरपालिकेच्या निवडणुका आहेत. या निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून पक्ष वाढीच्या दृष्टीने जिल्ह्याला मंत्रिपद मिळणे आवश्यक होते. पण, जिल्ह्याकडे दुर्लक्ष करण्यात आले.

विखे पाटील सातव्यांदा मंत्री अजित पवार गटाने जिल्ह्याला दिला भोपळा राधाकृष्ण विखे पाटील यांनी मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर लोणी येथे ग्रामस्थ, कार्यकत्यांनी जल्लोष केला तर काहींनी फुगडधा खेळून हा आनंद द्विगुणित केला.

Web Title: Ahmednagar district is tipped in the cabinet minister

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here