अहमदनगर जिल्ह्यात कोरोनाने मृत्यूची चिंता: गेल्या २४ तासांत तब्बल ७५ मृत्यू
अहमदनगर | Ahmednagar : अहमदनगर जिल्ह्यात रुग्णांची संख्या कमी होताना दिसत असली तरी मृत्यूची चिंता वाढत आहे. काल ३२ मृत्यूनंतर आज गेल्या २४ तासांत ७५ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे.
जिल्ह्यातीळ ३४११ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. आता एकूण बरे झालेल्या रुग्णांची संख्या २ लाख २४ हजार ५५६ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९१.७३ टक्के इतके झाले आहे.
गेल्या २४ तासांत जिल्ह्यात २४९२ रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे जिल्ह्याची एकूण कोरोनाबाधितांची संख्या २,४४,८०९ इतकी झाली आहे. तर सध्या उपचार सुरु असलेल्या रुग्णांची संख्या १७६०३ इतकी आहे. जिल्ह्यात एकूण मृत्यूची संख्या २६५० इतकी झाली आहे.
दरम्यान आज कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांत श्रीरामपूर २५८, श्रीगोंदा २०७, शेवगाव १५४, संगमनेर ४४३, राहुरी ३०१, राहता २२९, पाथर्डी १५७, पारनेर २३०, नेवासा १९४, नगर ग्रामीण २७६, कोपरगाव १५०, कर्जत ९४, जामखेड ६९, अकोले ३८८, मनपा २२४, कॅन्टोन्मेंट १६, मिलिटरी हॉस्पिटल २, इतर जिल्हा २४, इतर राज्य ३ अशा रुग्णांचा समावेश आहे.
Web Title: Ahmednagar Corona’s death anxiety