व्यापायाच्या घरावर डल्ला, लाखो रुपयांची चोरी
अहमदनगर | Ahmednagar: अहमदनगर जिल्ह्यात चोरट्यांचे सत्र सुरूच यामुळे नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. नगर शहरात एका व्यावसायिकाच्या घरी चोरट्यांनी चोरी करून रोख रक्कम, सोने चांदीचे दागिने असा ३ लाख ५ हजार रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना सोमवारी घडली आहे.
ही घरफोडीची घटना तारकपूर येथील सिंधी कॉलनी येथे घडली आहे. याप्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अशोक नंदलाला सुहेदा यांनी फिर्याद दिली आहे.
याबाबत समजलेली माहिती अशी की, अशोक नंदलाला सुहेदा हे सोमवारी सकाळी घर बंद करून कुटुंबांसमवेत निंबोडी येथे नातेवाईक यांच्याकडे आनंदवन पार्क येथे फिरण्यासाठी गेले होते. चोरट्यांनी याचाच फायदा घेत फिर्यादी यांच्या घराचा दरवाजा तोडून आत प्रवेश करत घरामधील ३ लाख ५ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. सुहेदा हे कुटुंब सायंकाळी साडे सहा वाजेच्या सुमारास घरी आल्यावर त्यांच्या घरात चोरी झाल्याचे लक्षात आले. यानंतर त्यांनी तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी अधिक तपास सहायक निरीक्षक रवींद्र पिंगळे हे करीत आहे.
Web Title: Ahmednagar Burglary on trader’s house