अहमदनगर आदर्श गाव हिवरे बाजार मध्ये चक्क गांजाची शेती..!
Breaking News | Ahmednagar: आदर्श गाव हिवरे बाजारमध्ये चक्क गांजाची शेती होत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर.
अहमदनगर: अहमदनगर जिल्ह्यातील आदर्श गाव म्हणून संपूर्ण महाराष्ट्रासह भारताला परिचित असलेले हिवरे बाजार म्हणून प्रसिद्ध आहे. विविध संकल्पना या गावांमध्ये राबविल्या जातात. त्याचा अभ्यास करण्यासाठी जगाच्या पाठीवरून अभ्यासक या ठिकाणी येत असतात. परंतु आता आदर्श गाव हिवरे बाजारमध्ये चक्क गांजाची शेती होत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
तेथील साहेबराव मारुती ठाणगे नामक शेतकऱ्याच्या शेतामध्ये गांजाचे झाड लावल्याचे नगर तालुका पोलिसांनी उघडकीस आणले. सुमारे अडीच किलो गांजा जप्त करण्यात आला असून याप्रकरणी साहेबराव मारुती ठाणगे याच्या विरोधात नगर तालुका पोलिस ठाण्यामध्ये पोलिस कॉन्स्टेबल मंगेश खरमाळे यांच्या फिर्यादीवरून दि.26 फेब्रुवारी रोजी सायंकाळी गुन्हा (crime) दाखल करण्यात आला आहे.
Web Title: Ahmednagar Adarsh Village Hivre Bazar is the cultivation of hemp
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study