Home अहमदनगर अहमदनगर अपघात! सफरचंदाचा पिकअप उलटला

अहमदनगर अपघात! सफरचंदाचा पिकअप उलटला

Breaking News | Ahmednagar Accident: टायर फुटल्याने कामरगाव घाटात अपघात.

Ahmednagar accident The apple pickup overturned

अहमदनगर:  मुंबईहून नगरला सफरचंद घेऊन येणाऱ्या पिकअपचा टायर फुटल्याने अपघात होऊन चालक गंभीर जखमी झाल्याची घटना नगर-पुणे महामार्गावर कामरगाव (ता. नगर) घाटात सोमवारी (दि. २६) पहाटे घडली. या अपघातात सफरचंदाचे सर्व कॅरेट रस्त्यावर पडून दोन लाखांपेक्षा जास्त सफरचंदाचे व पिकअपचे नुकसान झाले.

मुंबईहून सफरचंदाचे कॅरेट भरून एक पिकअप (क्र. एम.एच. २५ एजे ३३०७) नगरला येत होता. सोमवारी (दि.२६) पहाटे ३ ते ४ वाजता कामरगाव घाटात हा पिकअप टायर फुटल्याने उलटला त्यामुळे त्यातील सफरचंदाचे कॅरेट रस्त्यावर पडून सफरचंदाचा चेंदामेंदा झाला. या दुर्घटनेत पिकअप चालक अनिकेत गोसावी (रा. करमाळा, सोलापूर) हा गंभीर जखमी झाला. त्यास उपचारासाठी नगरच्या खासगी रुग्णालयात हलविण्यात आले आहे.

या अपघाताची माहिती मिळाल्यावर या परिसरात मृत्युंजय दूत म्हणून काम करणारे सिद्धांत आंधळे व त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत अपघातग्रस्त वाहन रस्त्याच्या बाजूला काढत वाहतूक सुरळीत केली. तसेच महामार्ग पोलिसांशी संपर्क साधून अपघाताची माहिती दिली.

Web Title: Ahmednagar accident The apple pickup overturned

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here