टाकळी ढोकेश्वरमध्ये ७ दुकाने फोडली, आंदोलनाचा इशारा
टाकळी ढोकेश्वरमध्ये ७ दुकाने फोडली, आंदोलनाचा इशारा
टाकळी ढोकेश्वर : पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वरच्या मुख्य बाजारपेठेतच शुक्रवारी मध्यरात्री चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे. सराफ दुकानातून दीड किलो वजनाचे चांदीचे दागिने, पायातील जोडवे, पैंजण जोड असा ऐवज घेऊन चोरटे चार चाकी वाहनातून पसार झाले. सात दुकाने फोडण्यात आली.
चोरटे सीसीटीव्हीमध्ये कैद झालेले आहेत परंतु ओळख पटविणे अवघड झाले आहे कारण त्यांनी तोंडाला रूमाल बांधलेले होते. मागील हप्त्यातच सहा दुकाने फोडण्यात आली होती. ही ताजी घटना असतानाच चोरट्यांनी शुक्रवारी रात्री पुन्हा दुकाने फोडल्याने पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
शुक्रवारी सायंकाळी ७ वाजताच चोरट्यांनी मोटारसायकल चोरून पहिली सलामी दिली. मोटारसायकल नेताना ग्रामस्थांनी पाठलाग केला, मात्र हातावर तुरी देत चोरटे पसार झाले. ही सलामी दिल्यानंतर पुन्हा रात्री सात दुकाने फोडली. अपघातास्थळी पोलीस असतानाच गावात चोरट्यांनी धुमाकूळ घातला.
पोलिसांच्या निष्क्रियेबाबत ग्रामस्थांनी तीव्र संताप व्यक्त केला असून चोरांचा बंदोबस्त न केल्यास आंदोलनाचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे. टाकळी ढोकेश्वर येथे शुक्रवारी रात्री चोरट्यांनी भर बाजारपेठेत धुमाकूळ घातला. पोपट वाळुंज यांचे सार्थक हार्डवेअर, संजय उदावंत यांचे तेजश्री ज्वेलर्स, राजेंद्र उदावंत यांचे बालाजी ज्वेलर्स, मातोश्री फोटो, मातोश्री फुटवेअर तसेच ढोकेश्वर महाविद्यालयामधून एलसीडी टीव्ही चोरून नेला. दरम्यान पोलीस गस्त सुरू असतानाच टाकळी ढोकेश्वर बायपासला ट्रक व मोटारसायकलचा अपघात झाला होता. या अपघातस्थळी पोलीस असतानाच रात्री दोनच्या सुमारास भरबाजार पेठेतील सात दुकाने फोडून चोरटे पसार झाले.
चोरट्यांनी सर्वप्रथम दुकानासमोरील सीसीटीव्हीच्या वायर तोडून सीसीटीव्हीचे कनेक्शन बंद केले. त्यानंतरही जे सीसीटीव्ही सुरू होते, त्यात तीन मिनिटात एक दुकान फोडल्याचे दिसत आहे. त्यामुळे हे सराईत गुन्हेगार असल्याची शक्यता आहे. त्यांच्या चार चाकी वाहनाचा अस्पष्ट दिसत असल्याने चोरांचा शोध घेणे पोलीस यंत्रणेला अवघड आहे. त्यामुळे चोर-पोलिसांचा हा खेळ कधी संपणार ? असा प्रश्न ग्रामस्थांमध्ये आहे.
आमच्या संगमनेर अकोले न्यूजच्या व्हाॅॅटस अॅप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा. रहा अपडेट दररोज. धन्यवाद. संगमनेर अकोले न्यूज–येथे क्लिक करा.
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा. आपल्याला ही बातमी आवडल्यास फेसबुक वर जरूर शेअर करा धन्यवाद.
https://redirect.viglink.com?key=c854d45afd385a32f8029d3a632d20e7&u=https%3A%2F%2Fwww.amazon.com%2FAcer-Chromebook-Celeron-Storage-CB3-132-C4VV%2Fdp%2FB0795W86N4%3F&type=TO