Home अहमदनगर शिर्डीत हॉटेलनंतर आता बंगल्यात वेश्याव्यवसाय, पोलिसांचा छापा

शिर्डीत हॉटेलनंतर आता बंगल्यात वेश्याव्यवसाय, पोलिसांचा छापा

Shirdi Crime News:  शिर्डीत पुन्हा एकदा हाय प्रोफाइल देहविक्रेय रॅकेटचा पर्दाफाश करण्यात पोलिसांना यश.

After hotel in Shirdi, now prostitution in a bungalow, police raid

शिर्डी:  शिर्डी मध्ये हॉटेलमध्ये देहविक्रेय रॅकेटचा पर्दाफाश करण्यात  आला होता. शिर्डीत पुन्हा एकदा हाय प्रोफाइल देहविक्रेय रॅकेटचा पर्दाफाश करण्यात पोलिसांना यश आले आहे.  चक्क एका बंगल्यात हा धंदा सुरू होता. पोलिसांनी  या बंगल्यावर छापा टाकून एका पिडीत मुलीची सुटका केली. या घटनेतील दोन संशयित आरोपींची कसून चौकशी करुन त्यांना पोलिसांनी  ताब्यात घेतले आहे.

डीवायएसपी संदीप मिटके यांना शिर्डी शहर परिसरात पिंपळवाडी रोड येथील बंगल्यात वेश्या व्यवसाय सुरु असल्याची खात्रीशिर बातमी मिळाली.  हे एक हाय प्रोफाईल रॅकेट असल्याचे देखील बोलले  गेले. त्यामुळे पोलिसांनी  त्या ठिकाणी बनावट ग्राहक पाठवुन पंचासमक्ष छापा टाकला.

यावेळी पोलिसांनी एका पिडीत मुलीची सुटका केली. यामध्ये दोघांना  ताब्यात घेण्यात आले. त्यांची चौकशी केल्यानंतर त्यांच्यावर शिर्डी पोलीस स्टेशन येथे अनैतिक व्यापारास प्रतिबंध कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी  दिलेल्या माहितीनूसार दौलत  किसन लटके (वय 47) आणि अकुश संजय घोडके (वय 19) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.

या कारवाईमुळे शिर्डी शहरातील अवैध धंदे करणार्‍यांचे धाबे दणाणले आहे. राकेश ओला (पोलीस अधीक्षक), स्वाती भोर यांच्या मार्गदर्शनाखाली संदीप मिटके, गुलाबराव पाटील, इरफान शेख, कुऱ्हे, शिंदे, जाधव ,भांगरे, गांगुर्डे या पोलीस  अधिकारी आणि कर्मचा-यांनी यांनी ही कारवाई केली.

Web Title: After hotel in Shirdi, now prostitution in a bungalow, police raid

See also: Latest Marathi NewsSangamner NewsAhmednagar NewsEducation Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here