Home अहिल्यानगर कोरोनाबाधिताच्या मृत्यूनंतर नातेवाइकांचा डॉक्टरवर हल्ला, हॉस्पिटलात तोडफोड

कोरोनाबाधिताच्या मृत्यूनंतर नातेवाइकांचा डॉक्टरवर हल्ला, हॉस्पिटलात तोडफोड

After death corona patient doctor beaten crime filed

अहमदनगर | Crime: आयसीयुमध्ये एक ७२ वर्षीय कोरोना रुग्ण उपचार घेत होता. तो रुग्ण ऑक्सिजन पाईप वारंवार काढून टाकत असे. गुरुवारी रात्री त्याने पाईप काढून टाकल्यामुळे त्याची प्रकृती खालावून काही वेळातच त्याचा मृत्यू झाला. आयसीयूमधील डॉक्टरांनी ही माहिती बाहेर नातेवाईक यांना सांगितली. यामुळे या नातेवाईकांनी डॉक्टर व कर्मचारी यांना मारहाण केली. तसेच हॉस्पिटलात तोडफोड केली. याप्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही घटना अहमदनगर शहरातील तारकपूर येथील सिटी केअर हॉस्पिटलमध्ये घडली. आयसीयूमधील काम करणारे डॉ. राहुल अरुण ठोकळ यांनी फिर्याद दिली आहे. त्यांनी फिर्यादीत म्हंटले आहे की, सिटी कोअर हॉस्पिटलमध्ये करोना वॉर्ड आयसीयूमध्ये त्यांची काल रात्रपाळीची ड्युटी होती. आयसीयूमध्ये तानाजी नारायण गडाख (वय ७२, रा. टाकळी काझी, नगर) हे ८ मे पासून कोविडवर उपचार घेत होते. त्यांना ऑक्सिजनवर ठेवण्यात आले होते. मात्र, रुग्ण सतत ऑक्सिजन मास्क काढून फेकत असे. त्यामुळे रुग्णाजवळ एका नातेवाईकाला थांबण्याची परवानगी देण्यात आली होती.

बुधवारी रात्री ११ वाजेच्या सुमारास सर्व डॉक्टर व कर्मचारी कामात व्यस्त होते. दुसऱ्या बेडवरील रुग्णांची तपासणी करत होते. त्यावेळेस गडाख यांनी ऑक्सिजन पाईप काढून टाकला. हे लक्षात येताच तेथील कर्मचारी यांनी तातडीने धाव घेत पाईप पूर्ववत केला. मात्र तोपर्यंत गडाख बेशुद्ध झाले होते. त्यांच्यावर उपचार सुरु करण्यात आले. नातेवैकाना तशी पूर्वसूचना देण्यात आली. त्याननंतर साडे बारा वाजेच्या सुमारास गडाख यांचा मृत्यू झाला.

डॉ. ठोकळ यांनी ही  माहिती त्यांचा मुलगा पंकज तानाजी  गडाख (वय ३०) व त्याचा मावस भाऊ रोहन बाबासाहेब पवार (वय २१, दोघे रा. टाकळ काझी, नगर) यांना दिली. ही माहिती कळताच त्यांनी चिडून डॉक्टरांना शिवीगाळ केली व मारहाण केली. ओपीडी मध्ये तोडफोड केली. कॉलर पकडून बाहेर आणत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्यांनतर पोलिसांना कळविण्यात आले. पोलिसांनी या दोघांवर गुन्हा दाखल केला आहे.

Web Title: After death corona patient doctor beaten crime filed

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here