अकोलेत प्राध्यापकाचे विद्यार्थिनीशी अश्लील चॅटिंग, रास्ता रोको
Breaking News | Akole: प्राध्यापकाने आपल्या मुलीच्या वयाच्या विद्यार्थिनीबरोबर अश्लील चॅटिंग केल्याचे उघड होताच या प्राध्यापकास विद्यार्थ्यांनी व संबंधित विद्यार्थिनीच्या पतीने महाविद्यालयात येऊन जाब विचारला.
अकोले: विद्यार्थिनीशी अश्लील चॅटिंग केल्याच्या आरोपावरुन येथील एका महाविद्यालयीन प्राध्यापकावर निलंबनाची कारवाई करावी, या मागणीसाठी झालेल्या आंदोलनामुळे अकोलेत काही काळ तणावपूर्ण स्थिती निर्माण झाली होती. सकल हिंदू समाजाच्या नेतृत्वाखाली येथील महात्मा फुले चौकात काही काळ रास्ता रोकोही करण्यात आला. संबंधित संस्थेच्या सचिवांनी या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी त्रिसदस्यीय चौकशी समिती नेमली जाईल, समितीच्या अहवालानंतर योग्य ती कारवाई केली जाईल,असे आश्वासन दिल्यानंतर तणाव निवळला.
अकोले येथील एका नामांकित महाविद्यालयातील प्राध्यापकाने आपल्या मुलीच्या वयाच्या विद्यार्थिनीबरोबर अश्लील चॅटिंग केल्याचे उघड होताच या प्राध्यापकास विद्यार्थ्यांनी व संबंधित विद्यार्थिनीच्या पतीने महाविद्यालयात येऊन जाब विचारला. संबंधित प्राध्यापकास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. दरम्यान, विविध संघटनांनी अकोले शहर बंद करत महात्मा फुले चौकात रास्ता रोको आंदोलन छेडले. यावेळी आंदोलकांनी प्राध्यापकास तातडीने निलंबित करण्याची मागणी केली. या विकृत मनोवृत्तीच्या प्राध्यापकाने संबंधित विद्यार्थिनीबरोबर पन्नास पाने अश्लील चॅटिंग व्हॉट्सअॅपवर केल्याचे कारवाईचे आश्वासन संबंधित महाविद्यालयाच्या व्यवस्थापनाने लवकरच विश्वस्त समितीची बैठक घेऊन प्राध्यापकास निलंबित करण्याची कारवाई करू, असे पोलिस ठाण्यात जमलेल्या समुदायास आश्वासित केल्यावर समुदाय शांत झाला. सबळ पुरावे हाती लागल्यानंतर संबंधित विद्यार्थिनीचा पती, नातेवाईक व विद्यार्थी यांनी प्राध्यापकास विचारणा केली.
अकोले शहरातील संबंधित महाविद्यालयातील एका प्राध्यापकाने विद्यार्थिनीशी अश्लील चॅटिंग केल्याच्या आरोपावरुन हिंदुत्ववादी संघटनांच्या कार्यकर्त्यांना मिळालेल्या माहितीनुसार त्यांनी महाविद्यालयाच्या प्रवेशद्वाराजवळ संबंधित प्राध्यापकाच्या विरोधात निषेधाच्या घोषणा दिल्या. तेथून हा जमाव पोलीस ठाण्यात गेला. तेथे यासंबंधी निवेदन देण्यात आले व संबंधित प्राध्यापकावर निलंबनाची कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली. यानंतर घोषणा देत जमाव महात्मा फुले चौक येथे गेला. काही काळ रस्त्यावरील दुकाने बंद करण्यात आली. त्यामुळे शहर बंद सारखी स्थिती निर्माण झाली होती.
महात्मा फुले चौक येथे काही वेळ रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. त्यानंतर पोलिसांनी हस्तक्षेप करत संस्था पदाधिकारी व आंदोलक कार्यकर्त्यांमध्ये समन्वय साधला. यावेळी सकल हिंदू समाजाचे कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झालेले पाहायला मिळाले. संबंधित संस्थेच्या सचिवांनी या आरोपांबाबत त्रिसदस्यीय समिती नियुक्त करून चौकशीचा अहवाल आल्यानंतर योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासन दिल्यानंतर तणाव निवळला.
Web Title: Adjunct professor chatting obscenely with student
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study