Home संगमनेर संगमनेरातील गुटखा तस्करांवर कारवाई, तिघांवर गुन्हा

संगमनेरातील गुटखा तस्करांवर कारवाई, तिघांवर गुन्हा

Sangamner Crime: तिघांविरुद्ध गुन्हा देखील दाखल केला असल्याने गुटखा विक्रेत्यांचे धाबे दणाणलेले.

Action against gutkha smugglers in Sangamner

संगमनेर: अहिल्यानगर येथील स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शहरात येवून कारवाई करत जवळपास चौदा हजार रुपयांचा गुटखा जप्त केला आहे. याप्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा देखील दाखल केला असल्याने गुटखा विक्रेत्यांचे धाबे दणाणलेले आहे.

संगमनेर शहरासह ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात अवैधरित्या गुटख्याची सर्रासपणे विक्री होत आहे. याबाबत शहर पोलीस व अन्न व औषध प्रशासन विभागाला माहिती असून देखील कारवाई केली जात नव्हती. यामुळे गुटखा विक्रेत्यांचे चांगलेच फावले आहे. वास्तविक पाहता शहर पोलिसांनी कारवाई करणे गरजेचे होते मात्र तसे झाले नाही. अहिल्यानगरच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शुक्रवारी (दि.7) शहरातील इंदिरानगर व रहेमतनगर या दोन ठिकाणी छापा टाकून जवळपास चौदा हजार रुपयांचा गुटखा जप्त केला आहे.

याप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस नाईक संदीप दरंदले यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन शहर पोलिसांनी विजय चंद्रकांत भागवत, मोसीन उर्फ मोबीन खलील शेख व आणखी एक अशा तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

Web Title: Action against gutkha smugglers in Sangamner

See also: Latest Marathi News,  Breaking News liveSangamner NewsAhmednagar News

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here