संगमनेर: देवीच्या दर्शनाला चाललेल्या रिक्षाला अपघात, पलटी होऊन अपघात
Sangamner Accident: अपघात होऊन राहूरी येथील देवीभक्त जखमी झाल्याची घटना संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील नांदुर गावालगत असणाऱ्या ओढयातील रस्त्यावर घडली.
संगमनेर: देवीला चाललेल्या वाहणाचा अपघात होऊन राहूरी येथील देवीभक्त जखमी झाल्याची घटना संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील नांदुर गावालगत असणाऱ्या ओढयातील रस्त्यावर शुक्रवार दिनांक ३० सप्टेंबर रोजी दुपारी घडली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की,राजेश बर्डे(रा. राहुरी) हे नवरात्र उत्सवा निमित्त त्यांच्या कुटुंबियांना व नातलगांना घेऊन अकोले तालुक्यातील पिंपळदरी येथील येडूबाईच्या दर्शनाला चालले होते तर त्यांनी गावातीलच रिक्षा भाड्याने घेतली होती. ते शुक्रवारी दुपारी नांदुर परीसरात आले असता वाहत चालकाचा वाहणावरील ताबा सुटला व रिक्षा पलटी झाली. रिक्षातील लहान मुले, महिला व राजेश बर्डे यांनाही मार लागला. रिक्षाचालकाने रिक्षा सरळ करुन तेथुन धुम ठोकली. ही घटना आजुबाजुच्या नागरीकांच्या लक्षात येताच नागरीकांनी घटनास्थळी धाव घेतली व जखमींना तातडीने नांदूर येथील खाजगी रुग्णालयात नेऊन तेथे त्यांच्यावर औषध उपचार करण्यात आले.
तर यावेळी सरपंच जयवंत सुपेकर, बापू सुपेकर, राजेंद्र सुपेकर,संजय सोनवणे,गंगाधर भागवत, भाऊसाहेब सुपेकर, वैभव रोकडे, दत्ता सुपेकर यांसह आदि युवक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Web Title: Accident to the rickshaw going to see the goddess