Breaking News! दुचाकी झाडावर आदळून तिघे ठार
Breaking News Accident: सुभाषग्राम-घोटमार्गावरील ठाकूरनगर पहाडीजवळ दुचाकी झाडावर आदळली. यात तिघे ठार.
घोट | गडचिरोली: चामोर्शी तालुक्यात सुभाषग्राम-घोटमार्गावरील ठाकूरनगर पहाडीजवळ दुचाकी झाडावर आदळली. यात तिघे ठार झाले. गुरुवारी सकाळी साडेनऊ वाजता ही घटना घडली. मृतांत दोन सख्ख्या भावांचा समावेश आहे.
साहेब सुभाशिष चक्रवर्ती (वय १६), सौरभसुभाशिष चक्रवर्ती (२०, दोघे रा. वसंतपूर, ता. चामोर्शी) व विशाल भूपाल बच्छाड (१९, रा. शिरपूर, क्र. १० तेलंगणा) अशी मृतांची नावे आहेत. वळणाजवळ भरधाव दुचाकी अनियंत्रित झाली व सागवानाच्या झाडावर आदळली. या धडकेत साहेब चक्रवर्ती व सौरभ चक्रवर्ती ही
भावंडे जागीच मृत्युमुखी पडली. उपचारादरम्यान विशाल बच्छाड याचा मृत्यू झाला. साहेब चक्रवर्ती हा दहावीत सुभाषग्राममध्ये, तर सौरभचक्रवर्ती हा बारावीत सुंदरनगर येथे शिकत होता. त्यांचे वडील मूलचेरा पंचायत समितीत लिपिक होते. तीन महिन्यांपूर्वीच त्यांचे निधन झाले. आता या दोन भावंडांच्या अपघाती मृत्यूमुळे वृद्ध आजी व आईचा आधार गेला. विशाल बच्छा हा तेलंगणातून आपल्या नातेवाइकांकडे आला होता. चक्रवर्ती बंधूंच्या घरासमोरच विशालचे नातेवाईक राहतात. यातून त्यांची ओळख झाली. गुरुवारी सकाळी चक्रवर्ती बंधू सुभाषग्राम येथील सलूनमध्ये जातो म्हणून घराबाहेर पडले. मात्र, सुभाषग्रामवरून ते पुढे दुचाकीने घोटकडे निघाले. दुर्दैवाने वाटेत काळाने झडप घातली.
Breaking News: Accident Three killed after bike hits tree