संगमनेर: दूध टँकरच्या धडकेने शिक्षकासह चालकाचा मृत्यू
Sangamner Accident: शाळेचे काम आटोपून घराकडे निघालेल्या शिक्षकांच्या मोटरसायकलला पिकअप धडक दिल्याने दोघे ठार झाल्याची घटना.
संगमनेर: संगमनेर तालुक्यात अपघाताचे सत्र सुरूच आहे. गेल्या आठ दिवसांत सात जणांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. शाळेचे काम आटोपून घराकडे निघालेल्या शिक्षकांच्या मोटरसायकलला पिकअप धडक दिल्याने दोघे ठार झाल्याची घटना काल सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास तालुक्यातील सायखिंडी फाट्याजवळ घडली.
या अपघातात अजय चंद्रभान नन्नवरे (वय 36, रा. सायखिंडी, ता. संगमनेर) व विलास रविंद्र ठोंबरे (वय 23, रा. शिवलवाडी, ता. मंचर) या दोघांचा मृत्यू झाला.
याबाबत समजलेली माहिती अशी की, अजय चंद्रभान नन्नवरे हे पुर्वी नाशिक तालुक्यातील कळवण येथे प्राथमिक शिक्षक होते. त्यांनी संगमनेर तालुक्यातील पिंपारणे येथे नुकतीच बदली करुन घेतली होती. काल आंदोलन झाल्यानंतर आज नन्नवरे हे आपल्या शाळेवर मित्रासोबत गेले होते. दोघेही शिक्षक असल्यामुळे एकाच गाडीवर गेले होते. शाळेचे काम आटोपल्यानंतर ते संगमनेर कडे येत होते. मित्राला घराकडे सोडल्यानंतर नन्नवरे हे सायखिंडी येथे चालले होते. ते सायखिंडी फाट्यावर असताना नाशिक येथून एक दुधाचा छोटा टँकर पुण्याकडे चालला होता. वाहनाचा इतका वेग होता की त्याने डिव्हायडर (दुभाजक) तोडून विरुद्ध बाजुने चाललेल्या नन्नवरे यांच्या गाडीला जोराची धडक दिली.
एम.एच 14 एच यु 0055 या क्रमांकाच्या टँकरने धडक दिली. या अपघातामध्ये दुधाचा टँकर तीन ते चार पलट्या खावून थेट शेजारी दहा ते पंधरा फुट खोल असणार्या खड्ड्यात जाऊन पडला. यात टँकरचा चालक विलास रविंद्र ठोंबरे याचा जागीच मृत्यू झाला.
Web Title: Accident Teacher along with driver killed in collision with a milk tanker
See Latest Marathi News, Ahmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App