Accident: कामावर जात असताना प्राध्यापिका महिलेला डंपरने चिरडले
Pune Accident News: धडक दिल्याने चाकाखाली येऊन महिलेचा मृत्यू, डंपरचालक फरार.
पुणे: पुणे येथे दुचाकीवरून कामावर निघालेल्या एका प्राध्यापिका महिलेच्या अंगावरून डंपरचे चाक (Accident) गेल्याने जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. सिंहगड रोडवर आज सकाळी ९ वाजता ही घटना घडली.
वृषाली तुषार थिटे असे अपघातात मयत झालेल्या प्राध्यापक महिलेचे नाव आहे. या अपघातानंतर सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात डंपरचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, वृषाली थिटे या नऱ्हे मध्ये असणाऱ्या झील कॉलेजमध्ये प्राध्यापक म्हणून कार्यरत होत्या.नेहमीप्रमाणे आज सकाळी कामावर दुचाकीवरून निघाल्या असता. वडगाव बुद्रुक येथील कॅनॉल शेजारी असलेल्या शिंदे मैदानाजवळ त्या आल्या यावेळी भरधाव वेगाने आलेल्या डंपरने त्यांना धडक दिली. या धडकेमुळे त्या खाली पडून चाकाखाली आल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. या अपघातानंतर डंपरचालक फरार झाला असून, पोलिस अधिक तपास करत आहेत.
Web Title: Accident professor was crushed by a dumper while going to work