Home Accident News ‘समृद्धी’वर भीषण अपघात, दोन कारच्या धडकेत सात जण ठार

‘समृद्धी’वर भीषण अपघात, दोन कारच्या धडकेत सात जण ठार

Breaking News | Samruddhi highway Accident: विरुद्ध दिशेने गेलेल्या एका कारची समोरून येणाऱ्या कारशी जोराची धडक झाल्याने झालेल्या अपघातात सात जणांचा मृत्यू झाला.

accident on 'Samriddhi', seven killed in two car collision

जालना : विरुद्ध दिशेने गेलेल्या एका कारची समोरून येणाऱ्या कारशी जोराची धडक झाल्याने झालेल्या अपघातात सात जणांचा मृत्यू झाला तर तिघे गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना शुक्रवारी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास समृद्धी महामार्गावर कडवंची (ता. जालना) शिवारात घडली. ही धडक इतकी भीषण होती की, कटरच्या सहाय्याने दरवाजे कापून मयत आणि जखमींना बाहेर काढावे लागले.

या अपघातात फयाज शकील मंसुरी, फैजल शकील मंसुरी, अल्थमेश मंसुरी (सर्व रा. मालाड पूर्व, मुंबई), प्रदीप लक्ष्मण मिसाळ (वय ३०, रा. पिंपळगाव, ता. देऊळगावराजा), संदीप माणिकराव बुधवत (वय ३०), विलास सुदाम कार्यदे (वय २८, दोघेही रा. उंबरखेड, ता. देऊळगावराजा) व अनिकेत चव्हाण (वय ३०, रा. देऊळगावराजा) या सात जणांचा मृत्यू झाला. तर शकील मंसुरी, अल्ताफ मंसुरी, राजेश कुमार हे तिघे जखमी झाले आहेत.

प्रदीप मिसाळ याच्या वडिलांचा कोरोनात मृत्यू झाला होता. तो आईचा एकमेव आधार होता. परंतु, समृद्धी महामार्गावरील अपघातात प्रदीपचा मृत्यू झाला असून, एकमेव आधार हरवल्याने त्याच्या आईवर दुःखाचा डोंगर कोसळला. विलास कायंदे हा ऑनलाइनची कामे करत होता. त्याच्या पश्चात आई, वडील, भाऊ असा परिवार आहे. अनिकेत चव्हाण याच्या पश्चात आई, वडील, तीन भाऊ असा परिवार आहे.

एक महिन्यापूर्वीच झाला होता विवाह

 संदीप बुधवंत हा कुटुंबाचा आधार होता. वाहन चालवून तो कुटुंबाचा उदरनिर्वाह करायचा. त्याचा एक महिन्यापूर्वीच विवाह झाला होता.  परंतु, अपघातात संदीपचा मृत्यू झाला असून, त्याच्या पश्चात आई-वडील, पत्नी असा परिवार आहे. अपघातातील एका गाडीचा असा चेंदामेंदा झाला.

Web Title: accident on ‘Samriddhi’, seven killed in two car collision

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here