एसटी बस आणि ट्रकचा भीषण अपघात, पाचपेक्षा अधिक प्रवाशांचा मृत्यू
Breaking News | Chandvad Accident: घाटात एसटी बस आणि ट्रक यांचा भीषण अपघात, ६ ते ७ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती.
नाशिक: मुंबईतील आग्रा महामार्गावर चांदवड मार्गावर एसटी बस आणि ट्रक यांचा भीषण भीषण अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. या अपघातात सहा ते सात जणांचा मृत्यू तर अनेक जण जखमी झाले आहेत. मुंबई आग्रा महामार्गावर चांदवड जवळील राहुड घाटात एसटी बस आणि ट्रक यांचा भीषण अपघात झाला आहे.
चांदवडच्या राहुड घाटात बस-ट्रकचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात 4 प्रवाशी दगवल्याची माहिती समोर आली आहे. ९ ते ९.३० वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाल्याची माहिती आहे. अपघातात काही प्रवासी जखमी झाले आहेत. बसचे टायर फुटून अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे.
नाशिक जिल्ह्यात ही घटना घडली आहे. चांदवड जवळील राहुड घाटामध्ये एसटी बस व ट्रकची जोरदार धडक झाली. यामध्ये ६ ते ७ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. तर अनेक जण जखमी झाले आहेत. घटनेची माहिती मिळताच पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले.
बस वसई जिल्हा पालघर आगाराची होती. ही बस जळगावहून वसईला निघाली होती. त्यावेळी चांदवडच्या रेणुका देवी मंदिराजवळील राहुड घाटादरम्यान हॉटेल ग्रीन व्हॅली जवळ पुढे जाणाऱ्या ट्रकने अचानक ब्रेक दाबल्याने हा अपघात झाल्याची माहिती बसचा चालक शैलेश सुर्यवंशी यांनी दिली आहे.
Web Title: accident involving ST bus and truck, more than five passengers dead
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study