संगमनेर: पुणे नाशिक महामार्गावर बस आणि मोटारसायकलचा भीषण अपघात
Sangamner Accident news: घारगाव जवळील एकोणावीस मैल फाट्यावर बस आणि मोटरसायकलचा भीषण अपघाताची घटना.
संगमनेर: पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील संगमनेर तालुक्यातील घारगाव जवळील एकोणावीस मैल फाट्यावर बस आणि मोटरसायकलचा भीषण अपघाताची घटना बुधवार दि. ८ मार्च रोजी दुपारी २:१५ वाजताच्या सुमारास घडली. या अपघातात एक जण गंभीर जखमी झाला असून दुसरा किरकोळ जखमी झाला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, एकोनाविस मैल फाट्यावर दुपारी २:१५ वाजताच्या सुमारास नवापूरहुन संगमनेर मार्गे पुण्याला जाणारी भरधाव बस क्रमांक (एम एच १४ बी टी २२१३) या बसने जुन्नर तालुक्यातील सुनील खंडू बटवाल व नंदाभाऊ नानाभाऊ कापरे हे दोघे मोटरसायकल (क्रमांक एम एच १४ एन ३१९८) वर स्वार होत एकोनावीस मैल फाट्याजवळील अतिथी मंगल कार्यालयात विवाह समारंभास जाण्यासाठी रस्ता क्रॉसिंग करताना बस आणि मोटरसायकलचा भीषण अपघात झाला. या अपघातात बसने मोटरसायकला पाठीमागून धडक दिल्याने यात मोटरसायकल स्वार नंदाभाऊ नानाभाऊ कापरे गंभीररीत्या जखमी झाले असून सुनील खंडू बटवाल किरकोळ जखमी झाले आहे. जखमींना खाजगी रुग्णवाहिकेतून उपचारासाठी आळेफाटा येथील माऊली हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले आहे.
Web Title: accident involving bus and motorcycle on Pune Nashik highway
See Latest Marathi News, Ahmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App