अहमदनगर: ट्रक आणि झायलो कारचा भीषण अपघात! तिघे ठार, दर्ग्याला जात असताना काळाचा घाला
Breaking News | Ahmednagar Accident: अहमदनगर दौंड महामार्गावर ट्रक आणि झायलो कारचा भीषण अपघात.
अहमदनगर: नववर्षाच्या आगमनाचा जल्लोष सुरु असतानाच अहमदनगरमधून भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. अहमदनगर दौंड महामार्गावर ट्रक आणि झायलो कारचा भीषण अपघात झाला. या अपघातात ३ जण जागीच ठार झाले असून ८ जण जखमी झालेत. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, अहमदनगर दौंड महामार्गावर रविवारी (३१ डिसेंबर) सकाळी ११ वाजता ट्रक आणि कारचा भीषण अपघात झाल्याची घटना आज घडली आहे. कारमधील सर्वजण हे श्रीगोंदा तालुक्यातील कोळगाव येथील दर्गाच्या दर्शनासाठी कल्याण वरून नगरकडे येत होते. यावेळी दौंडजवळ त्यांच्या एसयुव्हीची आणि भरधाव ट्रकची धडक झाली. ही धडक इतकी भीषण होती की कारमधील तिघांचा जागीच मृत्यू झाला तर ८ जण जखमी झालेत. तर कारचा चक्काचूर झाला आहे.
शाबाज अजीज शेख (वय, ३०) गाजी रउफ बांगी (वय, १३) व मुलगी लुजैन शोएब शेख – (वय, १३) अशी अपघातात मयत झालेल्यांची नावे आहेत. तर इतर ८ जण जखमी झालेत. हे सर्वजण कल्याणमधील राहणारे असल्याचे सांगण्यात येत आहे.
अपघाताची माहिती मिळताच स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना मदत केली. जखमींमधील काहींना दौड तर काहींना श्रीगोंदा येथील खाजगी हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आले आहे. देवदर्शनाला जाताना काळाने घाला घातल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहे.
Web Title: accident involving a truck and a Xylo car Three killed
See also: Breaking News live, Latest Marathi News, Sangamner News, Ahmednagar News, Education Study, Crime News