भीषण अपघात: प्रवासी वाहतूक करणारी जीप घसरून ५० फुट दरीत कोसळली
नंदुरबार: धडगाव तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत गोरंबा पाटीलपाडा येथे खराब झालेल्या रस्त्यामुळे प्रवासी गाडी उतारावरून घसरून थेट ५० फुट दरीत कोसळल्याने भीषण अपघात (Accident) झाला. या अपघातात एक प्रवासी ठार झाला तर सहा जण जखमी झाले आहेत. सर्व प्रवासी सेगलपाडा येथील रहिवासी आहेत. या घटनेने नागरिक संताप करीत आहे.
अपघात झालेले सदर वाहन किर्ता कागडा रहासे यांचे असून गोरंबाच्या सेगलापाडा येथील प्रवाशांना शहादा येथे बाजारासाठी घेऊन आले होते. घरी परत जात असताना गोरंबा पाटीलपाडाजवळ हलक्या पावसाच्या सरी कोसळत असताना तीव्र उतारावरून वाहन घसरल्याने थेट 50 फूट खोल दरीत कोसळले. यामध्ये मानसिंग वळवी (वय 65) या व्यक्तीचा मृत्यू (Death) झाला आहे. सदर रस्त्यावर अद्यापही शासनाकडून डांबरीकरण रस्त्याचे काम केलेले नाही. स्थानिक नागरिकांकडून माती टाकून कच्चा पर्यायी रस्ता तयार करण्यात आला आहे. सदर पाड्याला जोडणाऱ्या रस्त्यांचे काम तात्काळ करावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
Web Title: Accident jeep fell into a 50-foot ravine