Home अहिल्यानगर अहमदनगर ब्रेकिंग: कार-ट्रकचा भीषण अपघात; दोघांचा मृत्यू

अहमदनगर ब्रेकिंग: कार-ट्रकचा भीषण अपघात; दोघांचा मृत्यू

Ahmednagar News: भरधाव कार डिव्हायडरला धडकून ट्रकवर जावून आदळून भीषण अपघाताची (Accident) घटना, . या भीषण अपघातात  कारमधील दोघांचा मृत्यू.

Accident Car-truck crash Both died

अहमदनगर: भरधाव कार डिव्हायडरला धडकून ट्रकवर जावून आदळून भीषण अपघाताची घटना घडली. या भीषण अपघातात  कारमधील दोघांचा मृत्यू  झाला आहे.

नारायण खंडू पडघण (वय 26 रा. पिंपळगाव रोठा ता. पारनेर), अजिनाथ रमेश साळुंके (वय 21 रा. धानोरा ता. फुलंब्री, जि. छत्रपती संभाजीनगर) असे मयत व्यक्तींचे नाव आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी की, मंगळवारी रात्री पावणे दहा वाजेच्या सुमारास नगर-पुणे रोडवरील  चास (ता. नगर) शिवारात हा अपघात झाला. याप्रकरणी गुरूवारी नगर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. रामचंद्र भाऊराव पालवे (वय 39 रा. पालवेवाडी ता. पाथर्डी) यांनी फिर्याद दिली आहे. हुंडाई कंपनीची आय- 20 कारवरील चालक नारायण खंडू पडघण याने त्याच्या ताब्यातील कार भरधाव वेगात चालवून चास शिवारात डिव्हायडरला धडक दिली.

धडक ऐवढी भीषण होती की कार हवेत उडून डावे बाजूच्या लेनवरून जाणार्‍या फिर्यादीच्या ट्रकवर जावून आदळली. या अपघातात (Accident) कार चालक पडघण यांच्यासह कारमधील अजिनाथ साळुंके यांच्या मृत्यू  झाला आहे. याप्रकरणी अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक युवराज चव्हाण करीत आहेत.

Web Title: Accident Car-truck crash Both died

See Latest Marathi NewsAhmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here