अहिल्यानगर: तरुणीला नोकरीचे आमिष दाखवून अत्याचार
Breaking News | Ahilyanagar Crime: नोकरीचे आमिष दाखवून तरुणीवर वेळोवेळी अत्याचार केल्याचे समोर.
अहिल्यानगर : नोकरीचे आमिष दाखवून तरुणीवर वेळोवेळी अत्याचार केल्याचे समोर आले आहे. हा प्रकार ८ ते २६ नोव्हेंबर दरम्यान घडला. पीडितेने दिलेल्या फिर्यादीवरून संदेश सुभाष बोरगे (रा. बुरुडगाव) याच्याविरोधात कोतवाली पोलिस ठाण्यात अत्याचाराचा गुन्हा दाखल झाला आहे.
आरोपी हा डीजेवर ऑपरेटर म्हणून काम करतो. त्याने पीडितेला तुला डीजेवर ऑपरेटरची नोकरी लावून देतो, असे आमिष दाखविले. विश्वास संपादन करून त्याने पीडितेवर वेळोवेळी अत्याचार केले असल्याचे फिर्यादीत नमूद आहे.
Web Title: Abuse of young woman by luring her with a job
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study