महाराष्ट्र हादरला! दोन सख्ख्या बहिणींवर अत्याचार
Breaking News | Jalgaon Crime: 11 आणि 13 वर्षीय दोन सख्ख्या बहिणीवर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना.
जळगाव : राज्यात गेल्या काही दिवसांपासून महिला तसंच अल्पवयीन मुलींवर अत्याचार, बलात्कार, लैंगिक शोषणाच्या घटनेमध्ये झपाट्यानं वाढ होत आहे. “राज्यात दिवसाढवळ्या मुलींची छेडछाड काढली जात आहे. बंदलापूरमधील एका शाळेत दोन शाळकरी मुलीवर अत्याचार केल्याची घटना घडली होती, या घटनेने राज्य हादरुन निघालेले असतानाच आता जळगाव जिल्ह्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. जळगाव जिल्ह्यात 11 आणि 13 वर्षीय दोन सख्ख्या बहिणीवर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
10 सप्टेंबर ते 11 सप्टेंबर च्या दरम्यान या नराधमाने दोन्ही अल्पवयीन सख्ख्या बहिणींवर दोन वेळा अत्याचार केला आहे. धरणगाव पोलीस ठाण्यात बाल लैंगिक अत्याचार अधिनियम कायद्यानुसार संशयित आरोपी विनोद बारेला याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विनोद हुसेन बारेला असे नराधमाचे नाव असून त्याला धरणगाव पोलिसांनी अटक केली आहे.
अत्याचार केल्यानंतर घरात कुणाला सांगितले तर दोघांना मारून टाकण्याची देखील धमकी आरोपीने दोन्ही मुलींना दिल्याची माहितीसमोर आली आहे. दरम्यान पीडित मुलींनी हा प्रकार तिच्या आईला सांगितला त्यानंतर तिच्या आईने थेट धरणगाव पोलीस ठाण्यात धाव घेतली व संशयित आरोपी विनोद बारेला याच्या विरोधात तक्रार दिली. त्यानुसार धरणगाव पोलीस ठाण्यात बाल लैंगिक अत्याचार अधिनियम कायद्यानुसार संशयित आरोपी विनोद बारेला याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अल्पवयीन असलेल्या दोन सख्ख्या बहिणीवरील अत्याचाराच्या घटनेने जळगाव जिल्हा हादरला आहे.
Web Title: Abuse of two sisters
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study