Home औरंगाबाद संतापजनक! सावत्र बापाचा अल्पवयीन मुलीवर अत्याचार

संतापजनक! सावत्र बापाचा अल्पवयीन मुलीवर अत्याचार

Breaking News | Sambhajinagar Crime: मराठवाड्यात एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. सावत्र बापानेच अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे.

Abuse of minor girl by step father

छत्रपती संभाजीनगर: देशात महिलांवर होणाऱ्या अत्याचाराविरोधात जनक्षोभ असताना छत्रपती संभाजीनगरातही अशीच एक  संतापजनक घटना उघडकीस आली. एका सावत्र पित्याने आपल्या सोळा वर्षीय मुलीवर तब्बल सात महिने अत्याचार केला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी ४७ वर्षीय नराधम पित्याला बेड्या ठोकल्या आहेत.

पीडितेने दिलेल्या फिर्यादीनुसार, ३० ऑगस्ट २०१२ मध्ये पीडितेच्या वडिलांचे आजारपणामुळे निधन झाले होते. त्यामुळे पीडितेच्या आईने वर्ष २०१६ मध्ये नराधमाशी लग्न केले. चार वर्षांपासून पीडिता ही आई, नराधम सावत्र वडील व भावाबरोबर राहते. नराधम हा एका रुग्णालयात वॉर्डबॉय म्हणून कामाला आहे.

जानेवारीत पीडिता ही शाळेतून घरी आली, जेवण करून झोपली होती. घरी एकट्या पीडितेवर नराधम पित्याने अत्याचार केला. याबाबत कुणाला काही सांगितल्यास तुला व तुझ्या आईला घरातून हाकलून लावीन, अशी धमकी दिली. घाबरलेल्या पीडितेने याबाबत वाच्यता केली नाही. त्यानंतर आरोपीने पुन्हा १८ जुलै रोजी पीडितेवर अत्याचार केला.

पीडितेला मासिक पाळी येत नसल्याने व वारंवार पोट दुखत असल्याने तिच्या आईने चौकशी केली व तिला विश्वासात घेतले. त्यावेळी पीडितेने वरील घटना सांगितली. २८ ऑगस्ट रोजी पीडितेच्या आईने तिला एका खासगी रुग्णालयात आणले, सोनोग्राफीत पीडिता आठ महिन्यांची गर्भवती असल्याचे समोर आले. प्रकरणात उस्मानपुरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर पोलिसांनी नराधम आरोपीला अटक केली. न्यायालयाने आरोपीला ३१ ऑगस्टपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

Web Title: Abuse of minor girl by step father

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here