Home क्राईम संगमनेर: अल्पवयीन मुलीवर अत्याचार, ‘तुला घरी सोडवितो’ असे सांगून……

संगमनेर: अल्पवयीन मुलीवर अत्याचार, ‘तुला घरी सोडवितो’ असे सांगून……

Sangamner Crime: तालुक्याच्या ग्रामीण भागात अल्पवयीन मुलीवर अत्याचार (abused) केल्याची धक्कादायक घटना समोर. अत्याचार करणाऱ्याला पोलिसांनी अटक केली.

Abuse of a minor girl by making her sit on a bike

संगमनेर: संगमनेर तालुक्याच्या ग्रामीण भागात अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ‘तुला घरी सोडवितो’ असे सांगून अल्पवयीन मुलीला दुचाकीवर बसवून, तिला झाडा-झुडपात नेऊन तिच्यावर अत्याचार करण्यात आल्याची घटना शुक्रवारी (दि. १४) सकाळी ११ ते संध्याकाळी ५ वाजेच्या दरम्यान घडली. याप्रकरणी अत्याचार करणाऱ्याला पोलिसांनी अटक केली आहे.

पंकज शरद डुबे (रा. पेमगिरी, ता. संगमनेर) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. त्याच्याविरोधात पिडित मुलीच्या ४५ वर्षीय वडिलांनी संगमनेर तालुका पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून दिलेल्या फिर्यादीवरून, डुबे याने अल्पवयीन मुलीला दुचाकीवर बसवून बळजबरीने झाडाझुडपात नेले, दोन वेगवेगळ्या ठिकाणी त्याने तिला घेऊन जात तिच्यावर अत्याचार केले. या प्रकरणी मंगळवारी (दि. १८) रात्री संगमनेर तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून डुबे याला पोलिसांनी अटक करण्यात आली आहे. अधिक तपास संगमनेर तालुका पोलीस करीत आहे.

Web Title: Abuse of a minor girl by making her sit on a bike

See also: Latest Marathi NewsSangamner NewsAhmednagar NewsEducation Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here