Home क्राईम संगमनेर: घटस्फोटीत विवाहित महिलेवर प्रेमसंबंध निर्माण करून अत्याचार, औषध देऊन गर्भपात  

संगमनेर: घटस्फोटीत विवाहित महिलेवर प्रेमसंबंध निर्माण करून अत्याचार, औषध देऊन गर्भपात  

Sangamner rape Case: घटस्फोटीत महिलेबरोबर प्रेमसंबध निर्माण करून विश्वास संपादन करून अत्याचार, औषध खाऊ घालून गर्भपात.

Abortion by giving drugs to a married woman Rape

संगमनेर: लग्नाचे आमिष दाखवून विश्वास संपादन करीत घटस्फोटीत विवाहितेवर अत्याचार झाल्याची घटना शहरातील गणेशनगर परिसरात घडली. याप्रकरणी एका जणाविरुद्ध शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, शहरातील एका कॉलनीत राहणार्‍या महिलेचा तीन वर्षांपूर्वी घटस्फोट झाला होता. यानंतर ती आपल्या दोन मुलांसह वडिलांकडे राहत होती. दरम्यानच्या काळात मयुर विकास जेधे याच्यासोबत तिचे प्रेमसंबंध जुळले. दोन्ही मुलांना सांभाळील व तुलाही सांभाळील आपण लग्र करू असे आमिष दाखवून त्याने सदर विवाहितेचा विश्वास संपादन केला. त्याच्यावर विश्वास ठेवून आठ महिन्यांपूर्वी शहरातील गणेशनगर येथे सदर विवाहिता दोन्ही मुलांसह राहण्यासाठी गेली. याठिकाणी त्याने तिच्यासोबत वेळोवेळी शरीर संबंध (Sexual Relation) ठेवले.

ऑगस्टमध्ये मयुर जेधे याच्यापासून ती गर्भवती राहिली. याची माहिती समजतात मयूर याने औषध खाऊ घालून तिचा गर्भपात केला. त्यानंतर मयूर याने सदर विवाहितेस शारीरिक व मानसिक त्रास दिला. या महिलेकडे असलेले पैसेही त्याने संपवले. यानंतर मयूर हा सदर विवाहिता व तिच्या दोन मुलांना सोडून गेला. संतप्त झालेल्या सदर विवाहितेने शहर पोलीस ठाण्यात मयूर जेधे याच्याविरुद्ध फिर्याद दिली.पोलिसांनी या फिर्यादीवरून विविध कलमान्वये मयूर जेधे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक निकिता महाले या करीत आहे.

Web Title: Abortion by giving drugs to a married woman Rape

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here