Home अहमदनगर ‘तू आमच्या भाईला मारतो का?’ म्हणत तरुणावर कोयत्याने प्राणघातक हल्ला

‘तू आमच्या भाईला मारतो का?’ म्हणत तरुणावर कोयत्याने प्राणघातक हल्ला

Breaking News | Ahmednagar Crime: हल्लेखोरांनी ‘आमच्या भाईला मारतो का’, असे म्हणत तरुणावर कोयत्याने  हल्ला. तोफखाना पोलिस ठाण्यात सात जणांविरोधात गुन्हा दाखल.

A young man was assaulted with a knife

अहमदनगर : तरुणावर कोयत्याने वार करत प्राणघातक हल्ला झाल्याची घटना शुक्रवारी (ता.८) दुपारी तीन वाजता तपोवन रस्त्यावरील भिस्तबाग महाल परिसरात घडली. हल्लेखोरांनी ‘आमच्या भाईला मारतो का’, असे म्हणत तरुणावर हल्ला चढविला. अजय शिवाजी कर्पे (वय २४, रा.सावेडी गावठाण, अहमदनगर) असे हल्ला झालेल्या तरुणाचे नाव आहे. तोफखाना पोलिस ठाण्यात सात जणांविरोधात शनिवारी (ता.९) गुन्हा दाखल झाला. कर्पे यांनी दिलेल्या जबाबावरून गुन्हा दाखल झाला आहे.

मयूर बाळासाहेब सोमवंशी, ओंकार ठोंबरे, अभी तिरंदास (पाइपलाइन रोड, सावेडी), ताहीर मुन्ना शेख (रा.तपोवन रोड), जयदीप मते (पद्मानगर, सावेडी), विकास ऊर्फ विकी ढवण (रा.वाणीनगर, सावेडी), सोमनाथ गुंजाळ (पाइपलाइन रोड, सावेडी) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत.

फिर्यादी कर्पे हा तरुण भिस्तबाग महाल परिसरात एका कॅन्टीनमध्ये चहा पिण्यासाठी गेला होता. त्यावेळी आरेापी मयूर सोमवंशी हा साथीदारांसह त्या ठिकाणी आला व ‘तू आमच्या भाईला मारतो का’, असे म्हणत कर्पे याच्यावर कोयत्याने वार करण्यास सुरूवात केली. ओंकार ठोंबरे याने सिमेंटची चौकट उचलून डोक्यात मारण्याचा प्रयत्न केला. आरोपींनी लाथाबुक्क्यांनी फिर्यादी यांना मारहाण केली. घटनेची माहिती मिळाल्यानंतर तोफखाना पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक आनंद कोकरे हे पथकासह घटनास्थळी दाखल झाले होते.  अधिक तपास प्रदीप बडे करीत आहेत.

Web Title: A young man was assaulted with a knife

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here