Rape and murder: महिलेवर बलात्कार करून खून
Rape and Murder: कचरा वेचकाने तिचा खून केला असून महिलेला जबरदस्तीने निर्जनस्थळी नेत तिच्यावर बलात्कार.
पुणे: येरवड्यातील पर्णकुटी पायथा परिसरात झालेल्या महिलेच्या खुनाचा छडा लावण्यात पोलिसांना यश आले आहे. कचरा वेचकाने तिचा खून केला असून महिलेला जबरदस्तीने निर्जनस्थळी नेत तिच्यावर बलात्कार करून डोक्यात कठीण वस्तूने मारहाण करून खून केला. अशी माहिती येरवडा पोलिसांनी मंगळवारी दिली.
सतीश संतोष हारवडे (४५, रा. येरवडा, पुणे) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. गीता राजेशकुमार कुंभार (४६) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. १ ऑगस्टला पर्णकुटी पायथा भागातील झाडीत एका महिलेचा कुजलेल्या आवस्थेतील मृतदेह आढळून आला होता. शवविच्छेदनात तिचा डोक्यात मारहाण करून खून केल्याचे समोर आले होते.
Web Title: A woman was rape and Murder