Home नाशिक ब्रेकिंग न्यूज! पतंग उडवताना विहिरीत पडून शाळकरी मुलाचा मृत्यू

ब्रेकिंग न्यूज! पतंग उडवताना विहिरीत पडून शाळकरी मुलाचा मृत्यू

Breaking News | Sinner: पतंग उडवताना तोल जाऊन विहिरीत पडल्याने १३ वर्षीय शाळकरी मुलाचा विद्यार्थ्याचा मृत्यू (Died) झाल्याची घटना.

A schoolboy died after falling into a well while flying a kite

सिन्नर: तालुक्यातील पाडळी येथे पतंग उडवताना तोल जाऊन विहिरीत पडल्याने १३ वर्षीय शाळकरी मुलाचा विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याची घटना  गुरुवारी (दि. ४) दुपारच्या सुमारास घडली. आलोक संदीप रेवगडे असे मृत मुलाचे नाव आहे.

आलोक हा पाडळीच्या पाताळेश्वर माध्यमिक विद्यालयात सातवीत शिकत होता. शाळेत क्रीडा स्पर्धा आटोपल्यानंतर सर्व विद्यार्थी आपापल्या घरी गेले. रेवगडे कुटूंबीयांचे गावाजवळच नव्या घराचे बांधकाम सुरु आहे. दुपारी अडीच वाजेच्या सुमारास तिथेच आलोक दोन-तीन मित्रांसमवेत पतंग उडवित होता. पतंग आकाशात उंच झेपावल्यानंतर आसारीला ढिल देत तो मागे सरकत होता. मात्र, मागे विहीरी असल्याचे त्याच्या लक्षात आले नाही. त्यामुळे तोल जाऊन विहीरीत पडला. सोबतच्या सवंगड्यांनी मदतीसाठी आरडाओरड केली. ग्राम स्थही तातडीने धावले. आलोकला वाचविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करण्यात आले. मात्र, यश आले नाही. जवळपास अर्धा तासाच्या अवधीनंतर त्याचा मृतदेह हाती आला. सिन्नर ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. पाडळी येथील अमरधाममध्ये सायंकाळी आलोक याच्यावर शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्याच्या पश्चात आई, वडील, भाऊ, आजी, आजोबा असा परिवार आहे.

Web Title: A schoolboy died after falling into a well while flying a kite

See also: Breaking News live,  Latest Marathi NewsSangamner NewsAhmednagar NewsEducation StudyCrime News

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here