धोंड्यात पाच तोळ्यांची चेनच हवी, दिराचा अत्याचार
Ahmednagar Crime News: धोंड्याला पाच तोळ्यांची सोन्याची चेनच पाहिजे, अशी मागणी करीत पत्नीवर नवरा व दिराने सामूहिक अत्याचार (abuse) केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
अहमदनगर : धोंड्याला पाच तोळ्यांची सोन्याची चेनच पाहिजे, अशी मागणी करीत पत्नीवर नवरा व दिराने सामूहिक अत्याचार केला. तसेच या अत्याचाराचा व्हिडीओ तयार करून तो व्हायरल करण्याची धमकी दिल्याचा धक्कादायक प्रकार मुंबईत घडला आहे. या महिलेने माहेरी अहमदनगर येथील तोफखाना पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.
नगरमधील या २१ वर्षीय तरुणीचे मुंबई येथील तरुणाशी मे महिन्यात लग्न झाले होते. मुलीच्या वडिलांनी लग्नात दहा तोळे सोने दिले. लग्नानंतर चार दिवसांनंतरच विवाहितेचा छळ सुरू झाला. तुला स्वयंपाक करता येत नाही, तू भांडी व्यवस्थित घासली नाहीत, असे सांगून सासरच्यांनी तिला त्रास देणे सुरू केले. फर्निचर बनविण्यासाठी पैशांची मागणी केली. त्यास तिने नकार दिल्यामुळे पती व दिराने महिलेला आहे.
लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. सध्या धोंड्याचा महिना सुरू आहे. धोंड्यात मला पाच तोळ्याची सोन्याची चेन पाहिजे, अशी मागणी पतीने केली. त्यालाही महिलेने नकार दिला. त्यामुळे पतीसह सासू-सासऱ्यांनी विवाहिलेला हँगरने मारहाण केली.
शुक्रवारी पतीने कारणावरून महिलेशी वाद घातला. त्यावेळी पती व दिराने विवाहितेला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. शिवीगाळ करत पती व दीर महिलेला घेऊन बेडरूममध्ये गेले. तेथे दोघांनी महिलेवर बळजबरीने अत्याचार केला. घडलेला प्रकार जर कुणाला सांगितला तर अत्याचाराचा व्हिडीओ व्हायरल करू, अशी धमकी दिली, असे महिलेने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. या फिर्यादीवरून पती व दीर यांच्यासह सासू-सासऱ्यांविरुद्ध तोफखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला
Web Title: A chain of five tolas is required in Dhonda, abuse of wife by the husband
See also: Latest Marathi News, Sangamner News, Ahmednagar News, Education Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App