Home महाराष्ट्र 30 वर्षीय विवाहित महिलेवर सामूहिक अत्याचार

30 वर्षीय विवाहित महिलेवर सामूहिक अत्याचार

Breaking News | Nalsopara Crime: एका 30 वर्षीय महिलेवर सामूहिक अत्याचार (Gang Raped) करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर.

A 30-year-old married woman was gang raped

मुंबई : राज्यात गुन्हेगारी घटनांमध्ये सातत्याने वाढ होताना दिसत आहे. त्यात खून, खुनाचा प्रयत्न, दरोडा यांसारख्या घटना तर घडत आहेत. याशिवाय, महिलांवरील अत्याचाराच्या घटनेत लक्षणीय वाढ होत असल्याचे म्हटले जात आहे. असे असताना आता 30 वर्षीय विवाहित महिलेवर सामूहिक अत्याचार करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे.

 पालघर जिल्ह्यातील नालासोपारा येथे एका 30 वर्षीय महिलेवर सामूहिक अत्याचार करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यामध्ये तिघांनी मिळून हे घृणास्पद कृत्य केल्याचे उघडकीस आले. पीडित महिलेने पोलिसांत फिर्याद देताच आरोपींविरोधात गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली.

नरेंद्र मोरया, प्रकाश सिंह, पंचराज सिंह अशी गुन्हा दाखल केलेल्या आरोपींची नावे आहेत. पीडितेच्या तक्रारीवरून पोलिसांनी या तीनही आरोपींना अटक केली. या तक्रारीनंतर, विविध कलमांतर्गत आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्यांना अटक करण्यात आली आहे. पीडित महिला ही पोलिस ठाण्यात गेल्यानंतर तिने घडला प्रकार सांगितला. त्यानंतर नालासोपाऱ्यातील आचोळे पोलिसांनी तीन आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे.

दरम्यान, या अत्याचार प्रकरणातील आरोपी नरेंद्र मोरया, प्रकाश सिंह, पंचराज सिंह यांना न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी न्यायालयाने त्यांना 5 दिवसांची पोलिस कोठडी सुनाविण्यात आली आहे.

Web Title: A 30-year-old married woman was gang raped

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here