धक्कादायक! 16 वर्षीय तरुणीला चाकूचा धाक दाखवून अत्याचार
Breaking News | Washim Crime: एका १६ वर्षीय तरुणीवर चाकूचा धाक दाखवून अत्याचार करण्यात आल्याची धक्कादायक घटना.
वाशिम : वाशिम जिल्ह्यातील रिसोड तालुक्यात माणुसकीला काळीमा फासणारी धक्कादायक घटना समोर आली आहे. एका १६ वर्षीय तरुणीवर चाकूचा धाक दाखवून अत्याचार करण्यात आला आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. पीडित मुलगी कॉम्प्युटर क्लासेससाठी आपल्या गावातून शहरात आली असताना ही दुर्दैवी घटना घडली.
याबाबत अधिक माहिती अशी की, गुरुवारी दुपारी दोन आणि तीनच्या सुमारास वाशिमच्या रिसोड तालुक्यातील एक 16 वर्षीय शाळकरी मुलीवर चाकूचा धाक दाखवून लैंगिक अत्याचार झाल्याची घटना घडली. पीडित मुलगी कम्प्युटर क्लास करण्यासाठी ग्रामीण भागातून रिसोड शहरातील सिव्हिल लाईन परिसरात आली होती. क्लास झाल्यानंतर क्लास समोरून एका अनोळखी व्यक्तीनं तुझ्या मामाने बोलवलंय, मी तुझ्या दोन्ही मामांना ओळखतो, असं सांगत आरोपीने पीडितेच्या मामांची नावं सांगितली. तसेच आपण मामाशी फोनवर बोलत असल्याचा बहाणा करत मुलीला रिक्षात बसवलं. यानंतर आरोपी पीडितेला घेऊन रिसोड ते सवडच्या दरम्यान असलेल्या एका निर्जनस्थळी घेऊन गेला. इथं आरोपीनं चाकूचा धाक दाखवून तिला जिवे मारण्याची धमकी दिली आणि तिच्यावर लैंगिक अत्याचार केला.
आपला अॅप आजच येथून अपडेट करा: अहिल्यानगर न्यूज
यानंतर आरोपीने पीडितेला घटनास्थळी सोडून पळ काढला. यानंतर पीडित मुलगी मामा ज्या ठिकाणी काम करत होते, त्याठिकाणी आली. तिने रडत रडत सगळा घटनाक्रम मामांना सांगितला. भाचीसोबत घडलेला प्रकार समजल्यानंतर मामाने तातडीने मुलीच्या वडिलांना बोलावून पोलीस स्टेशनमध्ये धाव घेतली. याप्रकरणी रिसोड पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली आहे. पोलिसांनी बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यासह विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी पसार झाला आहे तर पोलीस त्याचा कसून शोध घेत आहे.
Web Title: A 16-year-old girl was assaulted at knifepoint