संगमनेर: मराठा क्रांती मोर्चा व सकल मराठा समाजाच्यावतीने प्रांत कार्यालयावर मोर्चा
मराठा क्रांती मोर्चा व सकल मराठा समाजाच्यावतीने प्रांत कार्यालयावर मोर्चा
संगमनेर – मराठा समाजाच्या आरक्षणासाठी सरकारकडून होणारी दिरंगाई बाबत मागील काही दिवसापासून महाराष्ट्रमध्ये मराठा समाजाकडून आंदोलन सुरु आहेत काल औरंगाबाद येथील काकासाहेब शिंदे या युवकाने मराठा आरक्षणसाठी जलसमाधी घेतली. यामुळे सकल मराठा समाजाच्यावतीने आज महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली होती.
संगमनेर येथील सकल मराठा समाजाच्या वतीने प्रांतअधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला होता. नाशिकरोड येथील सकल मराठा समाजच्या कार्यालयापासून मोर्चास सुरवात करून व्यापारी बांधवाना बंद मध्ये सहभागी होण्याचे आव्हान करण्यात आले, हा मोर्चा नाशिकरोड, बस स्थानक, शिवाजी महाराज पुतळा, मोमिनपुरा, मेन रोड, नवघर गल्ली, लिंक रोड , नवीन रोड मार्ग प्रांत कार्यालयावर मोर्चा आल्यानंतर या मोर्चेचे निषेध सभेत रुपांतर झाले.
यावेळी आमदार बाळासाहेब थोरात, आमदार सुधीर तांबे, राजाभाऊ देशमुख, शरदनाना थोरात, अमोल खताळ, जनार्धन आहेर, अमोल कवडे, खंडू सातपुते, बाळासाहेब गुंजाळ, रामहरी कातोरे, मिलिंद कानवडे, कपिल पवार, राजेंद्र सातपुते, सुमित पवार, बाळासाहेब मोरे, महेश वाकचौरे, धीर्याशील देशमुख, प्रवीण कानवडे, सौरभ देशमुख, अभिषेक थोरात, आशिष कोठवळ व सकल मराठा बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. मोर्चा मध्ये मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे, मयत काकासाहेब शिंदे यांच्या कुटुंबियांना १ कोटी रुपयाची आर्थिक मदत तसेच त्याच्या कुटुंबातील एका सदस्यला सरकारी नोकरी मध्ये सामावून घेतले पाहिजे आदी मागण्या यावेळी प्रांत अधिकारी भागवत डोईफोडे यांना देण्यात आले.
आमच्या संगमनेर अकोले न्यूजच्या व्हाॅॅटस अॅप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा. रहा अपडेट दररोज. धन्यवाद. संगमनेर अकोले न्यूज–येथे क्लिक करा.
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा. आपल्याला ही बातमी आवडल्यास फेसबुक वर जरूर शेअर करा धन्यवाद.
















































