संगमनेर तालुक्यात 32 जणांचे अहवाल करोना पॉझिटिव्ह
संगमनेर | Sangamner: संगमनेर तालुक्यात सोमवारी 32 करोनाबाधित आढळून आले आहेत. शहरातील दोन तर ग्रामीण भागातून 30 जण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. तालुक्याची एकूण बाधितांची संख्या 4 हजार 954 इतकी झाली आहे.
संगमनेर शहरात सोमवारी प्राप्त झालेल्या अहवालात जनतानगर येथील 37 वर्षीय पुरुष, संगमनेर येथे 53 वर्षीय पुरुष असे दोन जण बाधित आढळून आले आहेत.
ग्रामीण भागातून आंबी खालसा मध्ये 22 वर्षीय महिला, 20 वर्षीय तरुण, पिंपळदरी येथे 45 वर्षीय पुरुष, निमगाव जाळी येथे 55 वर्षीय पुरुष, उंबरी बाळापूर येथे 53,45 वर्षीय पुरुष, प्रतापपूर येथे 72 वर्षीय पुरुष, 21 वर्षीय तरुण, कोल्हेवाडी येथे 66 वर्षीय पुरुष, आश्वी बुद्रुक येथे 61 वर्षीय पुरुष, 24,20 वर्षीय महिला, पाच वर्षीय बालिका, गुंजाळवाडी येथे 61 वर्षीय पुरुष, 55, 50,28 वर्षीय महिला, चार वर्षीय बालिका, मालदाड येथे 25 वर्षीय तरुण, आश्वी खुर्द येथील 45, 18 वर्षीय पुरुष,16 वर्षीय तरुणी, पिंपरी येथील 28 वर्षीय तरुण, 21 वर्षीय तरुणी, कोठे खुर्द येथील 40 वर्षीय पुरुष, सावरगाव तळ येथे 30 वर्षीय पुरुष, पिंपळगाव देपा येथे 55 वर्षीय पुरुष, खांडगाव येथे 60 वर्षीय पुरुष, पेमगिरी येथे 64 वर्षीय पुरुष, 29 वर्षीय तरुण असे 32 पॉझिटिव्ह आढळून आले आहेत.
Web Title: Sangamner Taluka 32 corona report Positive