Home श्रीगोंदा विहिरीत भावंडाचा पाय घसरून पडल्याने दोघांचा मृत्यू

विहिरीत भावंडाचा पाय घसरून पडल्याने दोघांचा मृत्यू

श्रीगोंदा , Shrigonda

श्रीगोंदा | Shrigonda: श्रीगोंदा तालुक्यातील कोळगाव येथील लगडवाडी येथे पाय घसरून दोन सख्या भावंडाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. शुक्रवारी दुपारी ही घटना घडली. या घटनेमुळे लगडवाडीत दिवाळी साजरी झाली नाही.

अविष्कार सोनवणे वय ६ आणि कार्तिक सोनवणे वय ४ असे दोन सख्या भावांचे नावे आहेत.

कोळगाव येथील लगडवाडी परिसरात राहत असलेल्या कांतीलाल सोनवणे यांनी दोन मुले अविष्कार सोनवणे व कार्तिक सोनवणे हे दोघे भावंडे घराशेजारी असलेल्या विहिरीजवळ खेळत असताना पाय घसरून पडले. ते बराच वेळ दिसून न आल्याने सोनवणे परिवाराने शोध सुरु केला. यातील अविष्कार या मृतदेह पाण्यावरती तरंगताना सायंकाळी उशिरा लक्षात आले.

विहिरीमध्ये जास्त प्रमाणात पाणी असल्याने कार्तिक याचा मृतदेह सापडत नसल्याने मृतदेह शोधण्याचे काम स्थानिकांच्या मदतीने रात्री उशिरापर्यंत सुरु होते. शनिवारी रात्री २ वाजता कार्तिकचा मृतदेह बाहेर काढण्यात आले. या चिमुकल्याचे मृतदेह पाहून परिसरात शोककळा पसरली.  

Web Title: Shrigonda died when their brother’s foot slipped in the well


कडाक्याच्या थंडीत करा विजेची बचत, पैशाची बचत, आजच बसवा सोलर वॉटर हिटर, नामांकित कंपनीचे (V-Guard, Supreme) सोलर वॉटर हिटर मिळण्याचे एकमेव ठिकाण आर.पी.डी. एनर्जी. संगमनेर, दिवाळीनिमित्त खास ऑफर्स सुरु. संपर्क: 9850540436

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here