मराठा आरक्षणासाठी मी राजीनामा देईल: उदयनराजे भोसले
मुंबई: वेळ आल्यास मराठा आरक्षणासाठी राजीनामा देईन असे वक्तव्य उदयनराजे भोसले यांनी एका वृत्तवाहिनीच्या मुलाखतीत केलं आहे. मी कधीही राजकारण केले नाही. मराठा समाजाच्या आरक्षणाबाबत सरकारने ठोस निर्णय घेतले पाहिजे. कोणत्याही समाजावर अन्याय होता कामा नये. इतर समाजाबाबत आदर आहे. प्रत्येकाला न्याय मिळाला पाहिजे. सर्वाना समान अधिकार आहेत. त्यांच्यावर अन्याय झाला तर उद्रेक होईल असे राजे यांनी स्पष्ट केलं.
जनतेनं तुम्हाला निवडून दिले आहे. याची जाणीव लोकप्रतिनिधीनी ठेवली पाहिजे. समाजातील प्रत्येकाला न्याय मिळाला पाहिजे. जनतेला न्याय देता येत नसेल तर पदावर राहून काय उपयोग असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. मराठा आरक्षणाबाबत सरकारने काही ठोस पावले उचलेले नाही तर वेळ आल्यास राजीनामा देईन असे उदयनराजे म्हणाले.
मराठा आरक्षणाला स्थगिती दिल्याने समाजाच्या प्रगतीला मोठा अडथळा निर्माण होईल. उदयनराजे यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे. ते म्हणाले समाजाला विश्वासात घेऊन कार्यवाही केली असती तर मराठा आरक्षण टिकविता आले असते अशी भूमिका त्यांनी मांडली आहे.
See: Latest Entertainment News, Latest Marathi News, and Latest Marathi News Live
Web Title: I will resign for Maratha reservation Udayan Raje Bhosale