Home संगमनेर धक्कादायक: संगमनेर तालुक्यात आढळले तब्बल १६ करोनाबाधित

धक्कादायक: संगमनेर तालुक्यात आढळले तब्बल १६ करोनाबाधित

Coronavirus/संगमनेर: संगमनेर तालुक्यातील आज १६ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्यामुळे एकूण करोनाबाधितांची संख्या २२३ वर पोहोचली आहे.

संगमनेर तालुक्यात पंजाबी कॉलनीत पाच करोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. यात ४३, ४८, ४५ वर्षीय महिला तर ५८ व ३२ वर्षीय पुरुष यांचा समावेश आहे.

संगमनेर शहरातील नवघर गल्ली ६० वर्षीय व्यक्ती, विठ्ठलनगर ४० वर्षीय तरुण यांना करोनाची लागण झाली आहे.

संगमनेर तालुक्यातील खांडगाव १८ वर्षीय तरुण, नान्नज ४६ वर्षीय महिला , ४६ वर्षीय पुरुष तसेच चिखली येथून ३८ वर्षीय महिला, घुलेवाडी ४९ वर्षीय व ३६ वर्षीय पुरुष , निमोण ५२ वर्षीय दोन पुरुषांना करोनाची लागण झाली आहे. भारत नगर परिसरात मालदाड रोड ५२ वर्षीय पुरुष, एकता चौक ४९ वर्षीय पुरुष करोनाची लागण झाली आहे.

आज प्राप्त झालेल्या अहवालात १० अहवाल हे शासकीय रुग्णालयातून प्राप्त झाले आहेत तर सहा अहवाल हे खासगी प्रयोगशाळेतून समोर आले आहे.  संगमनेर तालुक्यात दिवसेंदिवस रुग्णांच्या संखेच्या गतीत वाढ होत असल्याने चिंता व्यक्त होत आहे.

वाचकहो, ‘संगमनेर अकोले न्यूज’ ला व्हाटस अप वर फॉलो करताय ना?… अजून जॉईन केले नसेल तर क्लिक करा -(Sangamner Akole News) आणि मिळवा ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलवर.  

Website Title: Coronavirus Sangamner taluka 16 corona patient infected

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here