Home राष्ट्रीय बिहारमधील एनडीएच्या प्रचंड विजयावर मोदींनी सांगितला बिहारच्या विजयाचा ‘MY’ फॉर्म्युला

बिहारमधील एनडीएच्या प्रचंड विजयावर मोदींनी सांगितला बिहारच्या विजयाचा ‘MY’ फॉर्म्युला

Bihar Election Result Live Updates: बिहार विधानसभा निवडणुकीत सत्तारुढ राष्ट्रीय लोकशाही आघाडीनं दणदणीत यश मिळवलं आहे. सत्तारुढ राष्ट्रीय लोकशाही आघाडीची  दोन तृतीयांश बहुमताकडं वाटचाल सुरु आहे. तर विरोधी पक्षाच्या महागठबंधनाला मोठा पराभव सहन करावा लागला आहे.

Bihar Assembly Election Results 2025

Bihar Assembly Election Results 2025: मतदान संपल्यानंतर जाहीर झालेल्या एक्झिट पोलमध्ये जवळजवळ सर्व सर्वेक्षण संस्थांनी एनडीएला मोठा विजय मिळण्याची शक्यता वर्तवल होती. एक्झिट पोलचा अंदाज खरा ठरला आहे, राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए) पुन्हा एकदा प्रचंड बहुमताने सरकार स्थापन करणार हे स्पष्ट झालंय. बिहारमध्ये, मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखालील एनडीएमध्ये जनता दल-संयुक्त (जेडीयू), भारतीय जनता पक्ष (भाजप), लोक जनशक्ती पक्ष (रामविलास), हिंदुस्तान अवामी मोर्चा (एचयूएम) आणि राष्ट्रीय लोक मोर्चा (आरएलएम) यांचा समावेश आहे.

बिहारमधील एनडीएच्या प्रचंड विजयानंतर पंतप्रधान मोदींनी ‘MY’ या नव्या फॉर्म्युल्याची चर्चा केली. दिल्लीतील भाजप (BJP) मुख्यालयातून ते म्हणाले, “मित्रांनो, एक जुनी म्हण आहे की, लोखंड लोखंडाला कापते. बिहारमध्ये काही पक्षांनी तुष्टीकरणाचा ‘MY’ फॉर्म्युला बनवला होता. पण आजच्या विजयाने एक नवा सकारात्मक ‘MY’ फॉर्म्युला दिला आहे, तो म्हणजे महिला आणि युवा.”

बिहारमधील एनडीएच्या प्रचंड विजयावर पंतप्रधान मोदी म्हणाले की, बिहारच्या निवडणुकीत जेव्हा मी ‘जंगलराज’बद्दल बोलत होतो, तेव्हा आरजेडीचे लोक कधीच विरोध करत नव्हते, पण काँग्रेसच्या लोकांना ते खूप खटकायचे. आता ते (जंगलराज) परत कधीही येणार नाही. बिहारच्या जनतेने एका समृद्ध बिहारसाठी मतदान केले आहे.

Bihar Election Result 2025 Live Updates in Marathi: बिहार निवडणुकीचे कल हाती आल्यानंतर आता अंतिम निकाल जाहीर होत आहेत. भाजप एकूण 91 जागांवर आघाडीवर आहे. त्यापैकी 8 जागांवर विजय घोषित झालेत. तर 83 जागांवर त्यांचे उमेदवार आघाडीवर आहेत. जदयू 83 जागांवर आघाडीवर असून त्यापैकी 6 उमेदवार विजयी घोषित करण्यात आले आहेत.तर,77 जागांवर जनता दल संयुक्त आघाडीवर आहे. राजद 27 जागांवर आघाडीवर असून एका ठिकाणी विजय घोषित झाला आहे. तर, 26 जागांवर राजदचे उमेदवार आघाडीवर आहेत. लोजपा रामविलासचे 19 उमेदवार आघाडीवर असून 1 उमेदवार विजयी झाला आहे. तर, 18 उमेदवार आघाडीवर आहेत. काँग्रेस 5, एमआयएम 5, हम पार्टी 5  जागांवर आघाडीवर आहे.

Breaking News: Bihar Assembly Election Results 2025

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here