संगमनेर: शेतकर्याने रस्त्यावर ओतला कांदा, गतिमान सरकारची लक्षणे
Breaking News | Sangamner: कांद्याला प्रतिकिलो फक्त 1 रुपया 85 पैसे बाजारभाव मिळाला. हा अपमान सहन न झाल्याने संतप्त होत थेट रस्त्यावर कांदा ओतून सरकारचा निषेध.

संगमनेर: तालुक्यातील वडगावपान येथील शेतकरी आबासाहेब मनोहर थोरात यांच्या कांद्याला प्रतिकिलो फक्त 1 रुपया 85 पैसे बाजारभाव मिळाला. हा अपमान सहन न झाल्याने संतप्त होत थेट रस्त्यावर कांदा ओतून सरकारचा निषेध केला.
कोल्हार-घोटी राज्य मार्गावरील वडगावपान फाटा येथे मंगळवारी (दि.11) दुपारी शेतकरी थोरात यांनी आपला संपूर्ण कांदा ट्रॅक्टर ट्रॉलीतून आणून रस्त्यावर ओतून तीव्र आंदोलन केले. त्यांच्या या कृतीमुळे परिसरात मोठा जमाव जमला. त्यानंतर शेतकर्यांनी एकत्र येत सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी वाहतूकही ठप्प झाली होती. संपूर्ण रस्ता लाल कांद्याने भरून गेला, रस्त्यावर अक्षरशः कांदेच कांदे पसरले होते. यावर्षी पावसाने कांदा पीक उद्ध्वस्त केले. तरीही शेतकर्यांनी पुन्हा उभारी घेत पिकाला सांभाळले. पण बाजारात विक्रीसाठी गेल्यावर कवडीमोल भाव मिळत असल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहे. विधानसभा निवडणुका होत एक वर्ष होत आहे मात्र गतिमान सरकार अजूनही कांद्याला योग्य दर देऊ शकला नाही. या परिस्थितीमुळे शेतकऱ्याचा मोठा अपमान होताना दिसत आहे.
शेतकरी सांगतात:
शेतकऱ्यांच्या आंदोलनामुळे सरकारने आणि बाजार समित्यांनी या गंभीर प्रश्नाकडे तातडीने लक्ष देण्याची गरज आहे. सध्याच्या परिस्थितीत कांदा उत्पादक शेतकरी आर्थिक संकटातून जात असून, त्यांना दिलासा देणारे ठोस उपाय योजले जाणे आवश्यक आहेत, शेतकऱ्यांच्या मालाला योग्य बाजारभाव मिळाला पाहिजे. असेही काही शेतकऱ्यांनी सांगितले.
Breaking News: Farmer pours onion on road, signs of dynamic government
















































