Home नाशिक फाटक्या नोटीमुळे ‘राडा’; दुचाकीस्वारावर तलवार उगारणे पडले महागात

फाटक्या नोटीमुळे ‘राडा’; दुचाकीस्वारावर तलवार उगारणे पडले महागात

Breaking News | Nashik Crime: एका ग्राहकाने दिलेली शंभर रुपयांची फाटकी नोट स्विकारण्यास पंपाच्या कर्मचाऱ्याने नकार दिल्याने त्याचा राग आलेल्या संबंधित ग्राहकाने दुसऱ्या दुचाकीस्वाराच्या डोक्यात तलवार मारुन दहशत.

Rada due to torn notes; Raising a sword at a biker cost a lot

नाशिक:  पेट्रोल पंपावर एका ग्राहकाने दिलेली शंभर रुपयांची फाटकी नोट स्विकारण्यास पंपाच्या कर्मचाऱ्याने नकार दिल्याने त्याचा राग आलेल्या संबंधित ग्राहकाने दुसऱ्या दुचाकीस्वाराच्या डोक्यात तलवार मारुन दहशत माजविली. डोक्यात हेल्मेट परिधान केलेले असल्याने संबंधित ग्राहक बचावला असून, या धक्कादायक प्रकारानंतर संबंधिताविरुद्ध गुन्हा दाखल करुन अटक करण्यात आली आहे.

मुंबई नाका पोलिसांनी खुनाच्या प्रयत्नात संशयित मदन लक्ष्मण सोमवंशी (रा. साईबाबा मंदिराजवळ, बजरंगवाडी) याला अटक केली आहे. त्याबाबत सुनील एकनाथ पगारे (३३ रा. पगारे मळा, गांधीनगर) यांनी फिर्याद दिली आहे. पगारे रविवारी (दि.९) सायंकाळच्या सुमारास एमएच १७ सीझेड ३३५४ या दुचाकीत पेट्रोल भरण्यासाठी नाशिक पुणा मार्गावरील बोधलेनगर येथील धात्रक पेट्रोल पंपावर गेले असता ही घटना घडली. पंपावर पुढे उभ्या असलेल्या संशयिताने शंभर रूपयांचे पेट्रोल वाहनात भरले.

दरम्यान, यावेळी फाटकी नोट कामगारास दिल्याने दोघांमध्ये वाद सुरू होता. फाटकी नोट घेण्यास कामगाराने नकार दिल्याने संतप्त संशयिताने दुचाकीस लावलेली धारदार तलवार काढून पाठी मागे उभे असलेल्या पगारे यांच्या डोक्यात वार केला. पगारे यांनी डोक्यात हेल्मेट घातलेले असल्याने ते बालंबाल बचावले असून यानंतर संशयिताने आरडाओरड करीत तलवार फिरवत परिसरात दहशत माजविली. या घटनेने पंपावरील ग्राहकही जीव वाचवित पळून गेले असून या घटनेची माहिती तात्काळ पोलिसांना कळविण्यात आल्याने त्यास तात्काळ बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. तपास उपनिरीक्षक समद बेग करीत आहेत.

Breaking News: Rada due to torn notes; Raising a sword at a biker cost a lot

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here