लग्नघरातच अग्नितांडव; विटा येथे एकाच कुटुंबातील चौघांचा होरपळून मृत्यू
Breaking News | Fire: भांडी व फर्निचर दुकानाला लागलेल्या भीषण आगीत एकाच कुटुंबातील चौघांचा होरपळून मृत्यू , गरोदर मुलीसह आई-वडील मृत्युमुखी, दोघे बचावले.

विटा (जि. सांगली): विटा येथे भांडी व फर्निचर दुकानाला लागलेल्या भीषण आगीत एकाच कुटुंबातील चौघांचा होरपळून मृत्यू झाला. यात दोन महिलांसह एक पुरुष व एका दोन वर्षांच्या चिमुकलीचा समावेश आहे. ही घटना सोमवारी सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास घडली.
विष्णू पांडुरंग जोशी (वय ५०), त्यांची पत्नी सुनंदा (४५), विवाहित मुलगी प्रियांका इंगळे (२८) व नात सृष्टी इंगळे (३, सर्व रा. सावरकरनगर, विटा) अशी मृतांची नावे आहेत. विष्णू यांची दोन मुले मनीष (२५) व सूरज (२२) हे प्रसंगावधान राखून गॅलरीतून बाहेर पडल्याने बचावले. आगीचे नेमके कारण समजू शकले नाही.
सावरकरनगरमध्ये जोशी यांचे जय हनुमान स्टील सेंटर हे भांडी व फर्निचरचे मोठे दुमजली दुकान आहे. तळमजल्यावर भांडी, पहिल्या मजल्यावर लाकडी फर्निचर, गादीच्या साहित्याचे दुकान व दुसऱ्या मजल्यावर जोशी कुटुंब राहण्यास आहे. राहत्या मजल्यावर जाण्यासाठी दुकानातच आतील बाजूने जिना आहे.
सोमवारी सकाळी दुकानात आग लागली तेव्हा दुकानाचे दोन्ही शटर आतून बंद होते. जोशी कुटुंबातील सहा सदस्य घरात होते. आग झपाट्याने पसरली. शटरमधून आगीचे व धुराचे लोट बाहेर पडू लागले. भांड्याच्या दुकानात आग लागल्याने जोशी कुटुंबाला जिन्याचा वापर करता आला नाही. ते घरातच अडकून पडले.
Breaking News: Fire breaks out at wedding venue Four members of the same family die in Vita
















































