Home औरंगाबाद घरात सुरू असलेल्या कुंटणखान्यावर धाड; दोन महिलांची सुटका, आरोपी फरार

घरात सुरू असलेल्या कुंटणखान्यावर धाड; दोन महिलांची सुटका, आरोपी फरार

Breaking News | Prostitution Business Raid: वेश्या व्यवसायावर शुक्रवारी (दि.७) रात्री पोलिसांनी कारवाई केली. या छाप्यात दोन पीडित महिलांची सुटका करण्यात आली असून, २७हजार ५३० रुपयांचा मुद्देमाल जप्त.

Raid on a brothel in a house Two women rescued

वाळूज महानगर : रांजणगाव शिवारातील हॉटेल डिंगडाँगजवळील एका दुमजली घरात सुरू असलेल्या वेश्या व्यवसायावर शुक्रवारी (दि.७) रात्री पोलिसांनी कारवाई केली. या छाप्यात दोन पीडित महिलांची सुटका करण्यात आली असून, २७हजार ५३० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, सर्व आरोपी फरार आहेत.

पोलिस उपायुक्त पंकज यांच्या अतुलकर मार्गदर्शनाखालील विशेष पथकाला मिळालेल्या गुप्त माहितीनुसार ही कारवाई करण्यात आली. एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्याच्या हद्दीत हॉटेल डिंगडाँगजवळील दुमजली घरात काही गरजू महिलांना डांबून त्यांच्याकडून वेश्या व्यवसाय करवून घेतला जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.

या माहितीनंतर पोलिस निरीक्षक प्रवीणा यादव, पोउपनि वैभव मोरे व पथकाने शुक्रवारी रात्री सुमारे ९.४३ वाजता छापा टाकला. यावेळी दोन महिलांकडून वेश्या व्यवसाय करून घेतल्याचे आढळले. पोलिसांनी तत्काळ या महिलांची सुटका केली. तसेच दोन ग्राहकांना ताब्यात घेतले. सदर कारवाईत मोबाइल फोनसह इतर साहित्य जप्त करण्यात आले.

चौकशीत पीडित महिलांनी सांगितले की, केटरिंगच्या कामासाठी बोलावून त्यांच्याकडून जबरदस्तीने वेश्या व्यवसाय करून घेतला. पोलिसांनी दोन ग्राहक मिलिंद पोपट पवार (रा. खिर्डी, ता. वैजापूर) आणि ललित विजय बडगुजर (रा. साईनगर, एन-४, छत्रपती संभाजीनगर) यांना ताब्यात घेतले. याप्रकरणी कुंटणखाना चालक सागर हॉटेलचा मालक विकी हायलिंगे, राहुल बनकर (रा. रांजणगाव), घरमालकाविरुद्ध एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. आरोपी अद्याप फरार आहेत.

Breaking News: Raid on a brothel in a house Two women rescued

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here