Home संगमनेर संगमनेर नगरपालिकेची निवडणूक महायुत्ती व महाविकास आघाडीत अंतर्गत धुसफूस सुरू

संगमनेर नगरपालिकेची निवडणूक महायुत्ती व महाविकास आघाडीत अंतर्गत धुसफूस सुरू

Breaking News | Sangamner Election: निवडणूक रंगात येताना, आत्ता माजीमंत्री बाळासाहेब थोरात व पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष.

Sangamner Municipality election Internal infighting continues

संगमनेरः संगमनेर नगरपालिकेची निवडणूक जाहीर झाल्यापासून महायुत्ती व महाविकास आघाडीत अंतर्गत धुसफूस सुरू झाली आहे. यातच नव्या जुन्यांचा बाद उफाळून आल्याने अर्ज दाखल करण्यापूर्वीच सर्वच राजकीय पक्षांनी संभाव्य धोका टाळण्यासाठी स्वतंत्र लढण्याची तयारी सुरू केली आहे. दरम्यान, निवडणूक रंगात येताना, आत्ता माजीमंत्री बाळासाहेब थोरात व पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष आहे.

गेल्या चार वर्षापासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका रखडल्या होत्या. मात्र निवडणूक आयोगाने नगर परिषदेच्या निवडणुकीचा कार्यक्रम दि. ४. तारखेला जाहीर केला. यामुळे गेल्या अनेक वर्षापासून वाट पाहणारे इच्छुक उमेदवार थेट मैदानात उतरले. संगमनेर शहरात महायुती, महाविकास आघाडी, स्थानिक विकास आघाडी, शहर विकास आघाडी की पक्ष, यावर काहीच हालचाल अद्याप सुरू झाली नाही. यामुळे पदाधिकारी, कार्यकर्ते व इच्छुकही नाराज झाले आहे. यात नगराध्यक्ष पद महिला राखीव असल्याने सर्वच मुख्य राजकीय पक्षांनी त्यावर दाबा सांगितला आहे. हा सत्तेचा मोह सुटणे अवघड असल्याने संभाव्य धोका टाळण्यासाठी राजकीय पक्षांनी व इच्छुकांनी स्वतंत्र तयारी सुरू केली आहे.

माजीमंत्री बाळासाहेब थोरात आता उमेदवारी देताना काय भुमिका घेतात, मविआतील घटक पक्षांना कसा न्याय देतात, तसेच माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, आमदार सत्यजित तांबे कशाप्रकारे निवडणुकीला सामोरे जातात. यावर निवडणुकीची खरी दिशा ठरणार आहे. अनेकांना उमेदवारीचे बाशिंग बांधले गेले आहे. तर काहींनी प्रभागात गाठीभेटी घेऊन प्रचाराची रंगीत तालिमही सुरू केली आहे. महायुती व महाविकास आघाडीला निवडणुका नेमक्या कशा लढवायच्या, याबाबत वरिष्ठ पातळीवरून कुठल्याच प्रकारच्या सूचना मिळालेल्या नाहीत. त्यामुळे घटक पक्षांमध्ये अस्वस्थता वाढली आहे. आता उमेदवारी नेमकी कोणाकडून करायची, असा प्रश्न इच्छुकांसमोर निर्माण झाला आहे.

पक्ष महाविकास आघाडीत काँग्रेस, शिवसेना व्याठा है दोन पक्ष सोडले तर इतर दखल घेण्यासारखे नाही. यामुळे काँग्रेसला रान मोकळे असून ते शिवसेना उबाठाला फारसे महत्व देत नाही. तर महायुतीत भाजपा, राष्ट्रवादी अजित पवार गट, शिवसेना शिंदे गट, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट हे असले तरी भाजपा व शिवसेना है दोनच पक्ष नगरपालिका निवडणुकीसाठी मैदानात उतरले आहे. यात राष्ट्रवादी व आठवले गटाचे काय, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

यातच महायुतीत संगमनेर निवडणूक संदर्भात कसलीच चर्चा अथवा बैठक झाली नाही. आमदार अमोल खताळ यांची पालिकेची पहिलीच निवडणूक आहे. शिवसेनेकडून इच्छुकांची संख्या अधिक असून सर्वांची मनधरणी करताना आमदार खताळ यांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, माजी खासदार सुजय विखे पाटिल यांनी अद्याप संगमनेर नगरपालिका निवडणुकीबाबत भूमिका स्पष्ट केली नाही. निवडणुकीसाठी वेळ कमी असताना कुठल्याच पक्षात एकसुत्री दिसत नाही. यातच उमेदवारीवरुन नवे जुने हा वाद आणखीच वाढला आहे. १५ प्रभागात ३० नगरसेवक आहे. यात महिलाची संख्या १५ असल्याने अनेक माजी नगरसेवकांनी नाराजी टाळण्यासाठी सौभाग्यवतींना मैदानात उतरविण्यासाठी पक्षाकडे मागणी केली आहे. माजी नगरसेवक व नगरसेविकांना कसे सामावून घ्यायचे हा मोठा प्रश्न पक्षातील म्होरक्यांना पडला आहे. तर अनेक तरुण नवीन चेहन्यांनी स्वतःच उमेदवारी जाहीर करून फिक्स नगरसेवक म्हणुन फ्लेक्सबाजी केली.

Breaking News: Sangamner Municipality election Internal infighting continues

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here