अहिल्यानगर जिल्ह्यात भरली हुडहुडी, कसे असेल हवामान
Breaking News | Ahilyanagar weather Update: रविवारी रात्री थंडीत वाढ झाल्याने रात्रीचे तापमान १० अंशापर्यंत घसरण्याची शक्यता.

अहिल्यानगर : थंडीला चांगलीच सुरुवात झाली असून, आता हुडहुडी भरू लागली आहे. रविवारी सकाळी अहिल्यानगर येथील तापमानाची नोंद १२.५ अंश सेल्सिअस इतकी नोंद झाली आहे. मात्र, रविवारी रात्री थंडीत वाढ झाल्याने रात्रीचे तापमान १० अंशापर्यंत घसरण्याची शक्यता आहे.
यंदा ऑक्टोबरमध्येही पाऊस झाला. नोव्हेंबर उजडला तरी पाऊस सुरूच होता. मात्र, शनिवारपासून पाऊस येणार नाही, असे हवामान खात्याने जाहीर केले. त्यानंतर थंडीला चांगलीच सुरुवात झाली. रविवारी सकाळी १२.५ अंश इतके तापमान नोंदले गेले. कमाल तापमान २८.९ अंश सेल्सिअस इतके नोंदले गेले. दुपारच्या वेळीही उन्हाचे चटके बसत होते. हवामान खात्याने पुणे व परिसरातील जिल्ह्यात आठवडाभर १२ ते १४ अंश इतके तापमान राहील, असे सांगितले आहे. तसेच पुढील आठ दिवस हवामान कोरडे आणि आकाश निरभ्र राहील, असे सांगितले आहे. त्यामुळे थंडीची तीव्रता वाढण्याची शक्यता आहे.
याबाबत हवामानतज्ज्ञ प्रा. डॉ. सतीश कुलकर्णी म्हणाले, हिमाचल प्रदेश, काश्मीरमध्ये हिमवृष्टी झाली आहे. त्यामुळे उत्तरेकडून थंड वारे वाहात आहेत. त्यामुळे महाराष्ट्रात थंडी वाढली आहे. यंदा थंडी चांगली राहणार असून, ती पिकांसाठी पोषक राहणार आहे. जास्त थंडी असल्याने पिकांवर कीटकही कमी राहतील.
दरम्यान, अहिल्यानगर शहरात रविवारी रात्री चांगलीच हुडहुडी भरली होती. थंडी सुरू झाल्याने नागरिकांनी उबदार कपडे वापरायला सुरुवात केल्याचे दिसून आले. शेकोट्याही पेटल्या आहेत.
Breaking News: Ahilyanagar state of confusion, what will the weather be like
















































