Home अहिल्यानगर अहिल्यानगर: महिलेचा विनयभंग करणार्‍या तरूणावर गुन्हा

अहिल्यानगर: महिलेचा विनयभंग करणार्‍या तरूणावर गुन्हा

Breaking News  | Ahilyanagar Crime: जनावरे चारण्यासाठी गेलेल्या एका महिलेचा दुचाकीवरून आलेल्या एका व्यक्तीने विनयभंग केल्याची घटना.

Crime against young man who molested woman

अहिल्यानगर: भिंगार कॅम्प पोलीस ठाणे हद्दीत जनावरे चारण्यासाठी गेलेल्या एका महिलेचा दुचाकीवरून आलेल्या एका व्यक्तीने विनयभंग केल्याची घटना शुक्रवारी (7 नोव्हेंबर) दुपारी दोनच्या सुमारास घडली आहे. यासंदर्भात पीडित महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात विनयभंग, अ‍ॅट्रॉसिटी कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संभा परभणे (पूर्ण नाव माहिती नाही, रा. कापूरवाडी, ता. अहिल्यानगर) असे गुन्हा दाखल झालेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना गुरूवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास ब्रम्हतळे, आलमगीर येथे घडली. पीडित महिला या परिसरात आपली जनावरे चारत होत्या. यावेळी संशयित आरोपी संभा परभणे हा तेथे आला. फिर्यादी महिलेच्या जातीची माहिती असतानाही, त्याने लैंगिक उद्देशाने तिच्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न केला. फिर्यादीनुसार, आरोपीने पीडितेला मिठी मारून फौजदारी पात्र बळप्रयोग केला आणि लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन करून तिचा विनयभंग केला.

Breaking News: Crime against young man who molested woman

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here