मेडिकल दुकानात आलेल्या 09 वर्षांच्या चिमुरडीवर नराधमाकडून अत्याचार
Breaking News | Latur Crime: एका ५० वर्षी नराधमाने ०९ वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार केल्याची संतापजनक घटना समोर.

लातूर : एका ५० वर्षी नराधमाने ०९ वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. या नराधमाला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. धक्कादायक आणि माणुसकीला काळीमा फासणारी घटनेमुळे गावात खळबळ उडाली आहे.
मिळालेली माहिती अशी की, , लातूर जिल्ह्याच्या शिरूर अनंतपाळ तालुक्यातील उजेड या गावात ही घटना घडली आहे. एका मेडिकल दुकानदाराने मेडिकलवर औषध खरेदी करण्यासाठी आलेल्या 09 वर्षाच्या चिमूरडीवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. मेडिकल दुकान मालक 50 वर्षीय दत्ता चिमणशेट्टे असं या नराधमाचं नाव आहे.
घराजवळच दुकान असल्यामुळे घरच्यांनी चिमुकलीला मेडिकल दुकानात पाठवलं होतं. पीडित मुलगी दुकानात येत असल्याचा आरोपी दत्ता चिमनशेट्टे त्याचा गैरफायदा घेत अमानुष कृत्य केले. चिमुरडीने घरी आल्यावर आपल्यासोबत घडलेलं कृत्य कुटुंबीयांना सांगितलं तेव्हा सगळ्यांना धक्का बसला. त्यांनी लगेच पोलीस स्टेशन गाठलं.
नराधम दत्ता चिमणशेट्टे विरोधात शिरूर अनंतपाळ पोलीस ठाण्यात बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी गावात जाऊन आरोपी दत्ता चिमणशेट्टे याला अटक केली आहे. तर पीडितेवर लातूरच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
Breaking News: A 9-year-old girl who came to a medical shop was abused by a man
















































