Home संगमनेर संगमनेरात वाळूमाफियावर कारवाई; तीन लाखांचा मुद्देमाल जप्त

संगमनेरात वाळूमाफियावर कारवाई; तीन लाखांचा मुद्देमाल जप्त

Breaking News | Sangamner Raid:  वाळूमाफियावर कारवाई करत ३ लाख ५ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला.

Raid against sand mafia in Sangamner Property worth three lakhs seized

संगमनेर:  शहराजवळून जाणाऱ्या निंभाळे चौफुली ते जोर्वे रस्त्यावरील हॉटेल अरोमा येथे अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गुरुव ारी (दि.६) वाळूमाफियावर कारवाई करत ३ लाख ५ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

याबाबत संगमनेर शहर पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, की पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी स्थानिक गुन्हे शाखेस जिल्ह्यामध्ये अवैधरित्या गौणखनिजांचे उत्खनन करून वाह तूक करणाऱ्या इसमांची माहिती काढून कारवाईचे आदेश दिलेले आहे. सदर आदेशानुसार गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेतील उपनिरीक्षक समीर अभंग, पोलीस अंमलदार संतोष खैरे, बाळासाहेब गुंजाळ, अमृत आढाव, योगेश कर्डिले यांचे पथक तयार करुन अवैधरित्या गौणखनिजांचे उत्खनन करुन वाहतूक करणाऱ्या इसमांची माहिती काढून कारवाई करण्याबाबत सूचना दिल्या.

सदर पथक वाळूमाफियांची माहिती काढत असताना अफरोज गुलाब पठाण (वय २९, रा. एकतानगर, रा. संगमनेर) हा एका विनाक्रमांकाच्या वाहनातून वाळू भरुन निंभाळे चौफुली ते जोर्वे गावाकडे जाणाऱ्या रस्त्याने जाणार असल्याची माहिती मिळाली. पथकाने तत्काळ अरोमा हॉटेलजवळ जा-वून सापळा रचून त्यास वाहनासह पकडले. सदर चालकास वाळूबाबत अधिक विच- ारपूस केली असता त्याने ही वाळू वाहतूक जावेद शेख पूर्ण नाव माहिती नाही याच्या सांगणेवरुन करत असल्याचे सांगितले. या कारवाईत ५ हजार रुपयांची अर्धा ब्रास वाळू व ३ लाख रुपये किमतीची गाडी असा एकूण ३ लाख ५ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. पोकॉ. बाळासाहेब गुंजाळ यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन वरील दोघांवर गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलीस करत आहे.

Breaking News: Raid against sand mafia in Sangamner Property worth three lakhs seized

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here