अहिल्यानगर: अल्पवयीन मुलीवर लॉजवर अत्याचार
Breaking News | Ahilyanagar Crime: लॉजवर नेत वारंवार अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली.

अहिल्यानगर: लग्नाचे आमिष दाखवून तरूणाने अल्पवयीन मुलीचा (वय 17) विश्वास संपादन केला. तिला लॉजवर नेत वारंवार अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. पीडितेने लग्नाचा विषय काढताच, जातीवाचक बोलून लग्नास नकार दिला. याप्रकरणी, अहिल्यानगर शहरातील पीडित अल्पवयीन मुलीच्या फिर्यादीवरून अविनाश नवनाथ निमसे (रा. शेंडी, ता. अहिल्यानगर) याच्या विरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात अत्याचार, पोस्को, अॅट्रॉसिटी आदी कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा प्रकार जानेवारी 2023 ते एप्रिल 2025 या कालावधीत घडला. फिर्यादी अल्पवयीन मुलीच्या ओळखीचा अविनाश निमसे याने तिला लग्नाचे आमिष दाखवले. त्याने मुलीला शेंडी येथील लॉजवर नेऊन तिच्यासोबत वारंवार शारीरिक संबंध ठेवले. मात्र, 20 ऑगस्ट 2025 रोजी त्याने तिला फोन करून जातीवाचक उल्लेख करून लग्नास नकार दिला.
त्यानंतर 1 नोव्हेंबर 2025 रोजी रात्री दोन वाजता त्याने पीडितेस फोनवर शिवीगाळ करून दमदाटी देखील केली. अखेर, पीडितेने बुधवारी (5 नोव्हेंबर) रात्री एमआयडीसी पोलीस ठाण्यात धाव घेत घडलेला प्रकार पोलिसांना सांगितला. घटनेचे गांभीर्य ओळखून, पोलिसांनी संशयित आरोपी अविनाश निमसे याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास अहिल्यानगर ग्रामीण विभागाचे पोलीस उपअधीक्षक शिरीष वमने करीत आहेत.
Breaking News: Ahilyanagar Minor girl raped at lodge
















































