Home अकोले अकोलेतील दुर्दैवी घटना ! बसखाली चिरडून एकाचा मृत्यू

अकोलेतील दुर्दैवी घटना ! बसखाली चिरडून एकाचा मृत्यू

Breaking News | Akole:  अकोले आगाराच्या बसने एका ४२ वर्षीय इसमाला चिरडल्याची दुर्दैवी घटना.

One person dies after being crushed under a bus

अकोले : अकोले आगाराच्या बसने एका ४२ वर्षीय इसमाला चिरडल्याची दुर्दैवी घटना पिंपळगाव नाकविंदा येथे मंगळवारी (ता. १४) ८ ते ९ वाजेच्या दरम्यान घडली. या घटनेत गणपत भानुदास लगड (वय ४२) यांचा मृत्यू झाला. याबाबत मिळालेली माहिती अशी की, अकोले आगाराची अकोले-देवगाव ही बस नेहमीप्रमाणे सायंकाळी देवगाव येथे मुक्कामी जात होती.

पिंपळगाव नाकविंदा येथे गणपत भानुदास लगड हे रस्त्यावरून पायी घराकडे जात असताना बस त्यांना चिरडून पुढे निघून गेली. घटनेनंतर नागरिकांना तातडीने पोलिसांना माहिती दिली. सदर मृत व्यक्तीचा मृतदेह कोतूळ येथे शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला. घटनेचा अधिक तपास अकोले पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक मोहन बोरसे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

Breaking News: One person dies after being crushed under a bus

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here