Home संगमनेर मोठी दुर्घटना! चंदनापुरी घाटात बस पलटी,  अपघात १० प्रवासी जखमी तर….

मोठी दुर्घटना! चंदनापुरी घाटात बस पलटी,  अपघात १० प्रवासी जखमी तर….

Breaking News | Sangamner Accident:  चंदनापुरी घाटात महाराष्ट्र परिवहन महामंडळाच्या बसला मोठा अपघात झाला आहे. संगमनेर तालुक्यातील चंदनापुरी शिवारात ही दुर्घटना.

Bus overturns at Chandanapuri Ghat, 10 passengers injured in accident

संगमनेरः नाशिक पुणे महामार्गावर असलेल्या चंदनापुरी घाटात महाराष्ट्र परिवहन महामंडळाच्या बसला मोठा अपघात झाला आहे. संगमनेर तालुक्यातील चंदनापुरी शिवारात ही दुर्घटना घडलीय. सुदैवाने बस रस्त्याच्या बाजुला असलेल्या दरीत कोसळली नाही. नाहीतर मोठा अनर्थ घडला असता. या अपघातात ९ ते १० जण जखमी झालेत.

नाशिक-पुणे महामार्गावरील संगमनेर तालुक्यात असलेल्या चंदनापुरी घाटात आज सकाळी एक मोठी दुर्घटना घडली. संगमनेरहून साकुरच्या दिशेने निघालेली एसटी बस (एमएच ०७ सी ९२५२) चंदनापुरी घाटातील एका धोकादायक वळणावर पलटी झाली. या अपघातात बसमधील शालेय विद्यार्थ्यांसह १० ते १२ प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत, तर सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.

मिळालेल्या माहितीनुसार, संगमनेरहून साकुरकडे प्रवासी घेऊन जाणारी एसटी बस जेव्हा चंदनापुरी घाटातून प्रवास करत होती, तेव्हा धोकादायक वळणावर चालकाचा बसवरील ताबा सुटला आणि बस रस्त्यावर पलटी झाली.

अपघात होताच परिसरात एकच खळबळ उडाली. या बसमधून शालेय विद्यार्थ्यांसह अनेक प्रवासी प्रवास करत होते. मात्र, जीवितहानी टळल्याने मोठा अनर्थ टळला. अपघातात किरकोळ जखमी झालेल्या १० ते १२ प्रवाशांना तातडीने जवळच्या वृंदावन हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. प्राथमिक उपचारानंतर त्यांना घरी सोडून देण्यात आले आहे.

दरम्यान, घटनेची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक वांबळे यांच्यासह डोळासने महामार्ग पोलीस पथकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि मदतकार्य सुरू केले. अपघातामुळे महामार्गावर काही काळ वाहतुकीची मोठी कोंडी झाली होती, मात्र पोलिसांच्या जलद कामगिरीमुळे वाहतूक पूर्ववत करण्यात यश आले.

या अपघातात जिजाबाई बाळासाहेब ढेरंगे (25, रा. बिरेवाडी, ता. संगमनेर), बाबाजी दाजी कारंडे (60, रा. बिरेवाडी, ता. संगमनेर), अंजनाबाई रामनाथ पथवे (70, रा. कळस, ता. अकोले), ओम दत्तात्रेय उंडे (20, रा. पिंपळगाव देपा, ता. संगमनेर), सखुबाई भिमाजी बोराडे (75, रा. गुंजाळवाडी, ता. संगमनेर), कोंडाबाई किसन बिडगर (50, रा. साकूर, ता. संगमनेर), भीमराव रामभाऊ भालेराव (60, रा. रांजणगाव, जि. छत्रपती संभाजीनगर), मकरंद संतोष गंभीरे (9, रा. कोपरगाव), तनिष्का संतोष गंभीरे (13, रा. कोपरगाव), लताबाई गजानन वनवे (65, रा. हिवरगाव पठार, ता. संगमनेर), रोहिणी पांडुरंग मलगुंडे (20, रा. पिंपळगाव देपा, ता. संगमनेर) अशी जखमी प्रवाशांची नावे आहेत.

Breaking News: Bus overturns at Chandanapuri Ghat, 10 passengers injured in accident

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here